काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Congress Leader Join Samajwadi Party : उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का. इमरान मसूद यांचे जावई शायान मसूद यांनी काँग्रेसचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Congress Leader Join  Samajwadi Party
CONGRESS FACES MAJOR SETBACK; SHAYAAN MASOOD RESIGNS AND JOINS SAMAJWADI PARTYsaam tv
Published On
Summary
  • शायान मसूद यांनी काँग्रेसचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला.

  • शायान मसूद हे इमरान मसूद यांचे जावई असल्याने या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • या राजीनाम्यानंतर मसूद कुटुंबातील राजकीय मतभेद चर्चेत आले आहेत.

काँग्रेस पक्षासह लोकसभा मतदारसंघाचे खासदार इमरान मसूद यांना जोरदार धक्का बसलाय. इमरान मसूद यांचे जावई शायान मसूद यांनी पक्षाला रामराम ठोकला. काँग्रेस पक्षात राजीनामा दिल्यानंतर शायान यांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.त्यानंतर आता कुटुंबातील कलहही चव्हाट्यावर आला आहे. यासह मसूद यांच्या मतदारसंघातील वर्चस्वालाही धक्का बसल्याचं म्हटलंय जातंय.

Congress Leader Join  Samajwadi Party
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी खेळला मोठा राजकीय डाव; भाजपच्या बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उत्तर प्रदेशात पुढच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवारीसाठी चाचपणी केली जातेय. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक आहे. इमरान मसूद हे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नेते मानले जातात. सहारनपूर मतदारसंघासह अन्य मुस्लिमबहुल भागात त्यांचा वरचष्मा आहे.

Congress Leader Join  Samajwadi Party
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

शायान मसूद यांनी का सोडला काँग्रेस पक्ष?

आगामी विधानसभा निवडणुकीत एकाही नातेवाईकाला उमेदवारी देणार नाही, अशी घोषणा इमरान मसूद यांनी केली होती. तर त्यांचे जवाई शायान हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे खासदार सासरांचा निर्णय जावयाचा जिव्हारी लागला. त्यानंतर जावाई शायान यांनी काँग्रेस पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला. लागलीच त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेत समाजवादी पक्षात प्रवेश केला. शायान यांच्यासोबत त्यांचे वडील शाजान समूद यांनीही सायकल हाती घेतलीय.

शायान मसूद हे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत काजी रशीद मसूद यांचे नातू आहेत. तर इमरान मसूद हे काजी यांचे भाचे आहेत. त्यामुळे सहारनपूर मतदारसंघात काजी आणि मसूद कुटुंबाचे वर्चस्व मानले जाते. राजकीय महत्वाकांक्षेपायी कुटुंबात कलह सुरू झालाय. याचा थेट फटका मसूद यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. इमरान मसूद यांच्यासोबत आपले वैचारिक मतभेद असल्याचे शायान यांनी म्हटलंय. त्यामुळे भविष्यात समाजवादी पक्षाकडून शायान यांना उमेदवारी दिली जाणार का, हेही पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com