

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
शरद पवारांनी आपल्या गटातील कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे.
पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती.
दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. आता शरद पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवलीय. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
या भेटीनंतर पार्थ पवार अधिकच आक्रमक झालेत. पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत बैठकांचा धडाका लावला आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर आता शरद पवार यांनी आपल्या गटातील पक्षातील कोअर कमिटीची बैठक बोलवली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
कोअर कमिटीमधील बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच पक्षाची पुढील भूमिका काय असेल हे ही ठरवण्यात येईल. या नवीन हालचालींमुळे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले गेलंय. अजित पवार अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधी चर्चांनी रान उठवलं होतं.
दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे झाले. पण या चर्चा दोन्ही गटाकडून फेटाळण्यात आल्या. त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीशिवाय काहीएक हाती लागले नाहीत. भाजपसोबत राहायचे, जायचे की आघाडीसोबत युती कायम ठेवायची असे अनेक चर्चा रंगल्या. तर या महिन्याच्या सुरूवातीला केंद्रीय स्तरावर अनेक घडामोडी समोर आल्या.
भेटी-गाठीच्या सुत्रांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा झाली. परंतु अद्याप त्यावर कोणताच निर्णय झाला नाहीये. या महिन्याच्या अखेरीस शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली. येत्या 29 ऑगस्टला कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या बैठकीत पक्षाची पुढील भूमिका आणि विलीनीकरणावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र शरद पवार यांनी वेळोवेळी या चर्चांना फेटाळून लावल्या होत्या. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती, त्यानंतर चर्चांना उधाण आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.