Shocking : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर बेछूट गोळीबार, भाषण करताना डोक्यावर धडाधड ३ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO

Colombian Presidential Candidate: राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर दिवसाढवळ्या बोगोटा शहरात निवडणूक सभेदरम्यान गोळीबार करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
Colombia
ColombiaSaam
Published On

कोलंबियात २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे नेते आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना दिवसाढवळ्या बोगोटा शहरातील निवडणूक सभेदरम्यान घडली. उरिबे रॅलीदरम्यान, जनतेला संबोधित करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या मागून गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले असून, आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोलंबियात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांनी कंबर कसली आहे. रॅली आणि प्रचार सुरू आहेत. मिगुएल उरीबे यांनी बोगोटा येथे निवडणूक रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान ते जनतेला संबोधित करत होते. संबोधित करीत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या आणि पसार झाला.

Colombia
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक, २० जण जखमी; गॅस गळतीमुळे वाहनं-घरांना आग | VIDEO

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, उरिबे यांना तीन गोळ्या लागल्या असून, त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली आहे. उरिबे यांचे रक्ताने माखलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. यात त्यांच्या डोक्याला झालेली जखम दिसत आहे. यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, संशियत हल्लखोराला अटक केल्याची माहिती बगोटाचे मेयर कार्लोस गॅलन यांनी दिली आहे.

Colombia
Amravati: “माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं” वडिलांची परिस्थिती बिकट अन्.. दहावीत ९६ टक्के मिळवणाऱ्या तरूणीची आत्महत्या

मिगुएल उरिबे यांचे कोलंबियाच्या राजकारणात महत्वाचे स्थान

वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी मिगुएल उरिबे कोलंबियाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळवले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात बोगोटा कौन्सिलचे सदस्य म्हणून केली होती. ते कोलंबियाचे माजी राष्ट्रपती जूलियो सेझर टर्बे यांचे नातू आहेत, ज्यांनी 1978 ते 1982 या काळात राष्ट्रपतीपद भूषवले होते. त्यांची आई डायना टर्बे, या एक प्रसिद्ध पत्रकार होत्या. 1991 मध्ये ड्रग माफियांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com