"किती रेल्वे थांबवणार अन् किती रस्ते अडवणार?" CJP च्या आंदोलनावरून केंद्रीय मंत्र्याचा थेट सवाल; राजकारण तापलं

दिल्लीतील CJP आंदोलनावरून केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी रेल्वे आणि रस्ते अडवण्याबाबत सवाल उपस्थित केला आहे. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार मान्य करत त्यांनी समस्यांवर संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे.
CJP Chalo Sansad Protest
CJP Chalo Sansad Protest
Published On: 

दिल्लीत कॉकरोज जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आंदोलनाच्या आधीच दिल्लीमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. त्याशिवाय ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहेच. इतकेच नाही तर ४० पेक्षा जास्त मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. राजधानीला येणाऱ्या रेल्वेही बंद करण्यात आल्या आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये सीजीपीचे आंदोलन होणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. या आंदोलनावर आता मंत्री पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोणी किती काळ रेल्वे रोखू शकतं? अन किती रस्ते अडवून धरू शकतं? असा थेट आणि तिखट सवाल एका केंद्रीय मंत्र्याने उपस्थित केला आहे.

केंद्रीय अन्न व प्रक्रिया मंत्री चिराग पासवान म्हणाले की, हे भारताचे तरुण आहेत; त्यांच्यामध्ये जगाला मार्ग दाखवण्याची क्षमता आहे. जसे आधीच्या पिढ्यांनी केले आहे, आणि म्हणूनच त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण अशा प्रकारे रस्ते अडवणे आणि गाड्या थांबवणे कितपत योग्य आहे?

CJP Chalo Sansad Protest
भाजपला मोठा झटका! नागपूरमधील बड्या नेत्याचा थेट राजीनामा; पक्ष सोडताना सांगितले मोठे कारण

हरियाणातील सोनीपत येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमानंतर बोलताना केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, "ही भारताची नवी तरुण पिढी आहे, तिला आता कोणीही रोखू शकत नाही. जे लोक समाजात गैरसमज पसरवत आहेत, त्यांना मला एकच विचारायचे आहे की नक्की किती रेल्वेगाड्या अडवता येतील? किती रस्ते आणि संपर्क यंत्रणा बंद पाडता येईल?"

ते पुढे म्हणाले, "भारताच्या तरुणांमध्ये अफाट क्षमता आहे. जसे आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी जगाला मार्ग दाखवला, तसाच आदर्श ही तरुण पिढीही घडवेल. म्हणूनच, अशा आंदोलनांनी किंवा अडथळ्यांनी या तरुणांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही."

CJP Chalo Sansad Protest
सत्ताधाऱ्यांना CJPच्या आंदोलनाचा धसका? मेट्रो आणि रेल्वे बंद, CJP आंदोलकांची धरपकड

आंदोलनातून नाही, संवादातूनच तोडगा निघेल

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी देशातील आंदोलने आणि संवादाच्या राजकारणावर मोठे भाष्य केले आहे. भारतासारख्या लोकशाही देशात आंदोलने ही एक सामान्य आणि आवश्यक गोष्ट आहे. पण संवादही तितकाच महत्त्वाचा आहे. CJP च्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना पासवान म्हणाले की, जर आंदोलन करायचेच असेल तर ते आज करा किंवा १० दिवसांनी करा, मात्र कोणत्याही समस्येचा अंतिम तोडगा हा नेहमी संवादातूनच निघतो, आंदोलनातून नाही.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था एकदम कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि ड्रोनने नजर ठेवली जात आहे. मात्र, मंत्र्यांच्या या विधानामुळे आता CJP चे कार्यकर्ते आणि सरकार आमनेसामने आले असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com