सत्ताधाऱ्यांना CJPच्या आंदोलनाचा धसका? मेट्रो आणि रेल्वे बंद, CJP आंदोलकांची धरपकड

Supreme Court Questions Metro and Railway Restrictions: CJPनं जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा आता अर्लट झालीय...दिल्लीत जमावबंदीचा आदेश काढत... मेट्रो आणि रेल्वे बंद करण्याचं फर्मान काढण्यात आलंय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
CJP protest latest news
CJP protest latest newssaam tv
Published On: 

ज्ञानेश कुमारांविरोधात CJPनं 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलनाचा धसका घेत थेट घरापासून रेल्वेस्थानकांपर्यंत आंदोलकांची धरपकड सुरु केलीय...मध्य प्रदेशातील GRP ने 25 आंदोलकांना रेल्वे गाड्यांमधून ताब्यात घेतलं... तर दुसरीकडे गोवा एक्सप्रेसमधून दिल्लीला जाणाऱ्या 50 विद्यार्थी आंदोलकांना ट्रेनमधून चक्क खाली उतरवण्यात आलं...इतकं कमी होतं की काय म्हणून महाराष्ट्रात तर CJP कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून दिल्लीत न जाण्याच्या धमकीवजा सूचना दिल्यात...त्यामुळे देशभरातील CJPच्या तब्बल 10 हजारहून अधिक आंदोलकांचं डिटेन्शन केल्याचा आरोप CJPनं केलाय...

दरम्यान कार्यकर्त्यांवरील या कारवाईवरुन CJP संस्थापक अभिजीत दिपके आक्रमक झालेत.. ही दडपशाही यशस्वी होणार नाही असा इशाराच दिपकेंनी दिलाय...

एकीकडे जंतरमंतरवर येणाऱ्या आंदोलकांची धरपकड होत असताना CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीत कलम 163 लागू करत...सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 57 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय...एवढंच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून सकाळी 4 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या दिल्लीला जाणाऱ्या अनेक ट्रेनही रेल्वे प्रशासनानं रद्द केल्यात.कोणत्या राज्यातून किती ट्रेन रद्द केलेत? पाहूयात...

दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेन रद्द?

उत्तर प्रदेश: 12 गाड्या

हरियाणा: 6 गाड्या

दिल्ली लोकल / EMU - 6 गाड्या

महाराष्ट्र - 5

बिहार: 4 गाड्या

राजस्थान:4 गाड्या

पश्चिम बंगाल: 2

मध्य प्रदेश- 2

दरम्यान यातूनही विद्यार्थी जंतरमंतरवर पोहोचले तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गृहमंत्रालयाने योजना आखलीय...

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने 8 ते 12 ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय दलांच्या सुमारे 23 हजार जवानांच्या तैनातीला मंजुरी दिलीय.

दिल्लीतील पोलीस बळ 5 हजारांवरून 15 हजारांपर्यंत वाढवण्यात आलंय

गाझीपूर, चिल्ला, टिकरी, सिंघू, गुरुग्राम, कापसेहरा, लोनी आणि बदरपूर या प्रमुख सीमांवर डिटेन्शन सेंटर्स उभारून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं जातयं..

दरम्यान रेल्वे रद्द करण्याच्या या निर्णयाविरोधात अभिषेक मनु, सिंघवी सिब्बल, प्रशांत भूषण यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली...या निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर थेट गदा येत असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं...तर या प्रकरणाच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका, असे खडेबोल दिल्ली मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाला सुनावलेत....

मुळात दिल्ली पोलिसांनीही गेल््या आंदोलनात नियमांचे उल्लंघन झाल्याचं कारण देत... CJPला आंदोलन करण्यापासून रोखलंयं...त्यामुळे यावेळी जंतरमंतरवरील आंदोलन रोखण्यासाठी वेगवेगळ्याप्रकारे प्रयत्न केले जात आहेत.. तरी देखील सत्ताधाऱ्यांच्या या हुकुमशाहीला झुगारून आंदोलक दिल्लीत कसे पोहचतात? आणि ज्ञानेश कुमारांविरोधात विद्यार्थी दिल्लीत कसा एल्गार पुकारतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com