दिल्ली पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असला तरी CJP काही हार मानायला तयार नाहीये. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या CJPनं मात्र यावेळी वेगळा मुद्दा घेऊन नवी दिल्लीतल्या कनॉट प्लेसवर तिरंगा मोर्चाची हाक दिली. जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याप्रकरणी आतुतोष रांका आणि सौरभ दास यांना ५ दिवसांसाठी तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलं.
त्याच्याच निषेधार्थ अभिजीत दिपकेंनी तिरंगा मोर्चाची हाक दिली. मात्र ज्या मित्राच्या घरी दिपके थांबलेले होते त्याठिकाणी पोलिसांनी येऊन आंदोलन न करण्याची नोटीस बजावली. मात्र दिपके आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे ते मोर्चा काढण्यासाठी कनॉट प्लेसकडे जात असतानाच पोलिसांनी त्यांना अडवलं आणि थेट ताब्यात घेतलं.
मात्र दिपकेंना ज्या गाडीतून पोलीस घेऊन जात होते ती गाडीच सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ गाडी रोखून धरली. मात्र अखेर पोलिसांनी दिपकेंना थेट पोलीस स्टेशन नेलं. तर दुसरीकडे AISA च्या अध्यक्ष नेहा बोरा यांनीही कनॉट प्लेसकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवलं. यावेळी नेहा बोरा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि अज्ञात स्थळी नेलं.
तर दुसरीकडे कनॉट प्लेसला पोलिस सुरक्षा आधी पासूनच वाढवलेली होती. मात्र तरीही सीजेपीच्या कार्यकर्त्यानी त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती. मुळात सीजेपीच्या जंतरमंतरवरील आंदोलनामुळे केंद्रातल्या एका मंत्र्यांला राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे सरकारनं आता जंतरमंतरबाबत कमालीची खबरदारी घेतलीय.
एवढंच नव्हे तर सीजेपीच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनाही आक्रमकपणे अटकाव करण्याची रणनीती आखलीय. आता सीजेपीचे सर्वच प्रमुख नेते रस्त्यावर नसल्यामुळे दिल्लीत आंदोलन कसं पुढे नेणार? याच मुद्यावरून पुन्हा राहुल गांधी रस्त्यावर उतरणार का? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.