हे नेमकं काय घडतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आता पाहा, या लोकांना काही गुंडांनी कसं पळवून पळवून मारलं.. या गुंडांनी आधी त्यांना घेरलं आणि मग एकएकटं गाठून त्यांच्यावर हल्ला चढवला.. त्यांचा दोष फक्त इतकाच होता की, जनावरांच्या गोठ्यात सुरु असलेली शाळा त्यांना देशाला दाखवायची होती.
स्कूल ठीक करोअभियानांतर्गत राजस्थानमधील रामपुरा-कँवरपुरा येथील राजकीय प्राथमिक विद्यालयाची भयानक दैना दाखवण्यासाठी CJP ची टीम पोहोचली . CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांचे सहकारी शाळेच्या दिशेने जात असतानाच, गावात दबा धरून बसलेल्या राजकीय गुंडांनी त्यांच्यावर थेट तुफान हल्ला चढवला, आशुतोष रांकांना वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू असतानाच, पाठीमागून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांना शाळा पाहणीआधीच मारुन पिटाळून लावलं यात काही महिला कार्यकर्त्यांना देखिल मारहाण झाली. हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आशुतोष आणि दिपकेंनी केलाय.
सीजेपीनं देशव्यापी स्कूल ठिक करो अभियान सुरु केलंय. अनेक शाळांमध्ये लाईट सोडाच, साधं शौचालय देखील नसल्याचं वास्तव समोर आलंय. ज्या शाळेत वर्ग भरवले जात होते ती शाळा तर चक्क जनावरांच्या गोठ्यात उघड्या शेड मध्ये भरते. दोन खोल्यांची ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असून ती दोरी बांधून बंद करण्यात आलीये. मुलांच्या जिवाशी खेळ सुरू असताना, हे पाप लपवण्यासाठी हा हल्ला केल्याचं बोललं जातंय. या हल्ल्यानंतर राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांनी काही कथित राजकीय पक्षांशी संबंधित लोक शाळांमध्ये जाऊन विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ट्विट करून हल्ल्याचं अप्रत्यक्ष समर्थन केलंय. भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानात यापूर्वी जयपूरमध्ये अभिजित दिपकेंवरही हल्ला झालाय. तर आताच्या रांकांवरील हल्ल्यात भाजपचा कार्यालय मंत्रीच थेट हल्लेखोरांसोबत दिसल्याने आता यावरून आणखी जोरात राजकारण पेटणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.