Chirag Paswan: राजकारणासह सोशल मीडियामध्ये चिराग पासवानाची तुफान हवा; तासाला वाढतेय फॉलोअर्सची संख्या

Chirag Paswan: चिराग पासवान यांना मोदी 3.0 मध्ये त्याला स्थान मिळाले आहे. त्यांनी रविवारी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली . चिराग पासवान यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झालीय. दर तासाला फॉलोअर्स वाढत आहेत.
Chirag Paswan: राजकारणासह सोशल मीडियामध्ये चिराग पासवानाची तुफान हवा; तासाला वाढतेय फॉलोअर्सची संख्या
Chirag Paswan Social Media Followers mint
Published On

लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग कुमार पासवान यांचा चाहतावर्ग राजकारणासह सोशल मीडियावरदेखील आहे. लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर चिराग पासवान यांच्या सोशल मीडियावरील चाहत्यांच्या संख्येमध्ये वाढ होतेय. मे महिन्यापासून ते आजपर्यंत इन्स्टाग्राम, फेसबुक आणि X प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.

बिहारच्या जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग कुमार पासवान हे सध्या चांगलेच चर्चेत आलेत. सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चिरागच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ होतेय. चिरागचे चाहते त्याला इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फॉलो करत आहेत.

१३ दिवसात गाठला १ मिलियन ते ३ मिलियनचा टप्पा

इंस्टाग्रामवर १० लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्याची माहिती खुद्द चिराग पासवानने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली होती. २६ मे २०२४ रोजी चिरागचे १० लाख फॉलोअर्स पूर्ण झाले. तर त्यांनी १.४ दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा अवघ्या १३ दिवसात पार केला. आता हा आकडा ३ दशलक्षांवर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. चिरागचे दिवसेंदिवस फॉलोअर्स संख्या वाढताना दिसतेय.

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चिराग पासवानची लोकप्रियता वाढत असून ३ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठलाय. बिहारचा एवढा लोकप्रिय नेता इन्स्टाग्रामवर फक्त ४ लोकांना फॉलो करत आहे. चिरागने आतापर्यंत एकूण २,०७८ पोस्ट शेअर केल्या आहेत.

X वरील फॉलोअर्स संख्या किती?

इन्स्टाग्रासोबत चिरागने X (ट्विटर) वरही धुमाकूळ घातलाय. सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवरही चिरागचा प्रभाव वाढताना दिसत आहे. चिरागचे X वर ९३९ k एवढे फॉलोअर्स आहेत. तर चिराग फक्त ११२ लोकांना फॉलो करत आहे. चिरागचे चाहते इन्स्टाग्राम,एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंत मर्यादित न राहता फेसबुकवरही वाढत चाले आहेत. फेसबुकवर ७८१ हजार फॉलोअर्स आहेत आणि तो फक्त ३ जणांना फॉलो करत आहे.

राजकीय पार्श्वभूमी

बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार चिराग पासवान यांना मोदी ३.० मध्ये त्याला स्थान मिळाले आहे. त्यांनी रविवारी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली .

चिराग पासवान यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे जवळचे प्रतिस्पर्धी सुधांशू शेखर भास्कर यांचा ८५,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव करून पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला होता. चिराग पासवान यांचे वडील दिवगंत. रामविलास पासवान हेही केंद्रात मंत्रीही राहिलेत. चिरागने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले आहे. चिराग लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Chirag Paswan: राजकारणासह सोशल मीडियामध्ये चिराग पासवानाची तुफान हवा; तासाला वाढतेय फॉलोअर्सची संख्या
Modi Cabinet 2024: मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; ४८ वर्षीय चंद्र शेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, संपत्ती वाचून म्हणाल...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com