जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन झालं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम युजरचे अकाउंट आपाओप लॉगआऊट होत आहेत. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम युजर बुचकाळ्यात पडले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन नेमकं का डाऊन झालं, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)
जगभरातील फेसुबक, इन्टाग्राम युजरचे अकाऊंट आपोआप लॉगआऊट होत आहेत. फेसबुक आणि इन्टाग्राम अकाऊंट अचानक लॉगआऊट झाल्याने युजर्सचा गोंधळ उडाला आहे. फेसबुक सुरु केल्यानंतर युजर्संना मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड मेसेज आला. त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगआऊट झाले आहे.
फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पासवर्ड नाकरला जात आहेत. तुम्ही फेसबुकच्या होम पेजवर गेल्यावर फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढत आहे. फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याता प्रयत्न केला तर एरर मेसेज येत आहे. त्यानंतर पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जात आहे.
दुसरीकडे इन्स्टाग्रामवरही त्याचप्रकारचा मेसेज येत आहे. त्यामुळे पासवर्ड बदलण्याची गरज नाही. कारण जगभरातील इन्स्टाग्राम आणि फेसबुक सेवा विस्कळीत झाली आहे. याबाबत लवकरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.
जगभरातील सर्व इंटरनेट सर्व्हिसेस डाऊन झाल्या. याच कारण Cloudflare डाऊन झाल्याचं सांगण्यात येत आहे. २१ जून २०२२ साली देखील असाच प्रकार झाला होता. Cloudflare डाऊन झाल्याने जगभरातील वेबसाइट्स बंद झाल्या होत्या. Cloudflare जगातील सर्वात मोठी इंटरनेट सर्व्हिस आणि सिक्योरिटी कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील कंपन्यांना सर्व्हिस देते.
फेसुबक आणि इन्स्टाग्रासह जगातील काही इतर वेबसाइट्स देखील डाऊन होत आहे. Downdetector म्हणण्यानुसार, युट्यूब आणि 'एक्स' देखील काही लोकांचं डाऊन झालं आहे.
फेसबुक डाऊन झाल्यावर पॅरेंट कंपनी मेटाने म्हटलं की, 'आम्हाला माहिती मिळत आहे की, सर्व युजर्सना फेसबुक अकाऊंट सुरु करण्यास अडचणी येत आहे. या अडचणीबद्दल क्षमस्व. आम्ही ही समस्या लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.