रस्त्यावर हजारो विषारी साप, पुराच्या पाण्यात सापांचा सुळसुळाट

Maharashtra Politics Buzz: रस्त्यावर हजारो विषारी साप फिरत असतील, तर नेमकं काय होईल? याचा विचारच न केलेला बरा... मात्र चीनमध्ये पुराच्या पाण्यात हजारो साप वाहत नागरी वस्तीकडे जातायत? मात्र हे हजारो साप नेमके आले कुठून? नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या रिपोर्टमध्ये...
Thousands of venomous snakes seen moving through floodwaters toward residential areas in Guangxi, China.
Thousands of venomous snakes seen moving through floodwaters toward residential areas in Guangxi, China.saam tv
Published On

पूर आला की माणसं जीव वाचवण्यासाठी पळतात... पण कल्पना करा, त्याच पुराच्या पाण्यात जर तुमच्या दिशेनं हजारो विषारी साप पोहत येत असतील तर? विचार करूनच अंगावर शहारा आला ना? पण हा कोणताही हॉलिवूड सिनेमा नाही, तर चीनमध्ये घडलेली थरारक आणि भयावह वास्तविक घटना आहे. चीनमध्ये 'मायसाक' हे वादळ आलंय... त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन गुआंगशी प्रांतात रस्त्यावर हजारो सापांचा चक्क पूर आलाय...मात्र हे साप पुराच्या पाण्यात नेमके कुठून आले? पाहूयात...

चीनमधील गुआंगशी हा भाग जगातील सर्वात मोठ्या सर्प प्रजनन केंद्रांसाठी ओळखला जातो. औषधं आणि चामड्याच्या वस्तूंसाठी इथे तब्बल 3 कोटी सरपटणारे प्राणी पाळले जातात. मात्र पुराच्या तडाख्यात मोठं सर्प पालन केंद्र पूर्णपणे वाहून गेलं...या दुर्घटनेनंतर फार्ममधून घातक कोब्रासह हजारो साप अचानक पुराच्या पाण्यात मोकळे फिरू लागलेत... पुराच्या गढूळ पाण्यातून हे हजारो साप रहिवासी भागाकडे वेगाने पोहत जातायत..

या भयंकर संकटानंतर स्थानिक प्रशासनाची मोठी धावपळ उडालीय.. सापांना पकडण्यासाठी तातडीने 10 तज्ज्ञ सदस्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले असून पथक मासेमारीची जाळी, काठ्या आणि 'स्टेन गन' सारख्या अत्याधुनिक शस्त्रांसह पुराच्या पाण्यात उतरून या विषारी सापांचा शोध घेतय...चीनमधल्या या भागातील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे कडक आदेश देण्यात आलेत..आधीच पुरपरिस्थितीमुळे गुआंगशी प्रांतात 26 जणांचा मृत्यू झालाय.. त्यात विषारी सापांचा पूर आल्यामुळे चीनमधील नागरिकांमध्ये दहशत पसरलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com