भीषण अपघात! भरधाव मिनी बस झाडाला धडकली; 6 जणांचा जागीच मृत्यू, 39 प्रवासी जखमी

Chhattisgarh Mini Bus Accident: छत्तीसगडमधील मनेन्द्रगड येथे अनियंत्रित मिनी बस झाडाला धडकून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू, तर ३९ जण जखमी झालेत.
Chhattisgarh mini bus accident kills six and injures 39
Chhattisgarh mini bus accident kills six and injures 39saam tv
Published On: 
Summary
  • मनेन्द्रगड येथे प्रवासी मिनी बसचा भीषण अपघात.

  • अनियंत्रित मिनी बस झाडाला धडकल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू

  • अपघातात ३९ प्रवासी जखमी झाले आहेत.

छत्तीसगडमधील मनेन्द्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यातील मनेन्द्रगड येथे एका प्रवासी मिनी बसचा भीषण अपघात झालाय. बस अनियंत्रित झालेली बस झाडावर आदळल्यानं घडलेल्या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर ३९ प्रवासी जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार बसमधील प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश आणि दुःखाचे वातावरण पसरले होते. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Chhattisgarh mini bus accident kills six and injures 39
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातापूर्वीचा थरारक VIDEO समोर, ७ जणांनी गमावले प्राण

हा अपघात केलहारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय. मनेन्द्रगड रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. स्वप्नील तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेले ३९ जण सध्या मनेन्द्रगड येथे उपचार घेत आहेत. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. अपघाताची नेमकी कारणे काय आहेत, याचा तपास केला जातोय.

पोलीस अधीक्षकांनी काय सांगितलं?

छत्तीसगडमधील मनेन्द्रगड येथे झालेल्या अपघाताबाबत पोलीस अधीक्षक रत्ना सिंग यांनी एक निवेदन जारी केलंय. त्यांनी सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतंय. यासह मिनीबसमध्ये तिच्या निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, असेही पोलीस अधीक्षकांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.

Chhattisgarh mini bus accident kills six and injures 39
Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

अपघातात जखमी झालेल्या मनेंद्रगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. बस अपघातानंतर माजी आमदार गुलाब कामरो यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केलीय. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपये आणि जखमींना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आवाहन केलंय. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यात पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या तिघांना एका भरधाव मिनी-कार्गो वाहनाने धडक दिली होती. भाजपचे आमदार पुन्नुलाल मोहले यांच्या चुलत भावासह तिघांचाही या अपघातात मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com