Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय?

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV
Published On: 

Petrol Diesel Rates : आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ होताना दिसत आहे. त्याचा परिणाम शनिवारी सकाळी जारी झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून आला. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेलाचे दर स्थिर आहेत. (Latest Marathi News)

Petrol Diesel Price Today
Mumbai-Pune Highway Accident Update : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस दरीत कोसळली; 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू, 27 जण जखमी

15 एप्रिल रोजी महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. हरियाणामध्ये पेट्रोल 97.48 रुपये आणि डिझेल (Diesel) 90.31 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. बिहारमध्ये पेट्रोल (Petrol) 109.23 रुपये आणि डिझेल 95.88 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 96.27 रुपये आणि 89.44 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येही १४ एप्रिलचे दर लागू आहेत.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
Mumbai Traffic News: मुंबईला जोडणाऱ्या 3 महामार्गांवर दोन दिवस वाहतुकीत मोठा बदल; सलग सुट्ट्या आणि महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com