Mumbai Traffic News: मुंबईला जोडणाऱ्या 3 महामार्गांवर दोन दिवस वाहतुकीत मोठा बदल; सलग सुट्ट्या आणि महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Mumbai Traffic News: 14 आणि 16 एप्रिल असे दोन दिवस मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गांवर अवजड वाहतुकीला बंदी असणार आहे.
Heavy Vehicle
Heavy Vehicle Saam TV
Published On: 

रायगड : मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे जुना महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सलग तीन सुट्ट्यांमुळे एकाच वेळी अनेक नागरिक पर्यटन तसेच गावी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय आंबेडकर जयंती तर 16 रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी. त्यामुळे राज्यभरातून अनेक जण एकाच वेळी या महामार्गांवर वापर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शासनाने निर्णय घेतला आहे.

Heavy Vehicle
Mumbai-Pune Highway Accident Update : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस दरीत कोसळली; 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू, 27 जण जखमी

14 आणि 16 एप्रिल असे दोन दिवस मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गांवर अवजड वाहतुकीला बंदी असणार आहे. त्यानुसार वाळू/रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीवर घातली बंदी

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाला रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक वगैरे अशा विविध जिल्ह्यांतुन सुमारे 15 ते 20 लाख अनुयायी येणार असल्याने शासनाचे अवजड वाहतुकीवर निर्बंध घातले आहे. (Latest News Update)

Heavy Vehicle
Video: धक्कादायक! 30 रुपयांसाठी मेडिकल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण! CCTV फुटेज व्हायरल

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बॉटलनेक पॉईंट तयार होऊन वाहतुक कोंडी होण्याची शासनाला भिती आहे. आंबेडकर जयंती, शनिवार, रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने नागरीक, पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com