

Chandrayaan 3 News: 'चांद्रयान-३'चे (Chandrayaan 3) यशस्वी लँडिंग करत भारताने इतिहास रचला. ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे जगभरातच सध्या चांद्रयान-३ ची चर्चा होत आहे. अशामध्ये चांद्रयान- ३ चे डिझाइन मीचं तयार केले असल्याचा दावा करुन लोकांची फसवणूक करणाऱ्या कथित वैज्ञानिकाला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. आपण इस्रोचे वैज्ञानिक असल्याचा दावा करत या व्यक्तीने स्थानिक प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील एका व्यक्तीने चांद्रयान-3 मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल डिझाइन केल्याचा दावा केला होता. तसंच या व्यक्तीने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याचे देखील सांगितले होते. हा खोटा दावा करुन लोकांची फसवणूक करणाऱ्या या मिथुल त्रिवेदी या व्यक्तीला सूरत पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे.
या व्यक्तीने केलेले सर्व दावे खोटे असल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सखोल चौकशीत असे दिसून आले की या व्यक्तीचा इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेशी कोणत्याही प्रकारशी संबंध नव्हता आणि त्याने इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचा खोटा दावा केला होता. या व्यक्तीने इस्रोच्या पुढील प्रकल्पासाठी अवकाश संशोधन सदस्य होण्याचे बनावट पत्रही तयार केले होते.
चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर मितुल त्रिवेदी याने सुरतमधील स्थानिक प्रसारमाध्यमांकडे जाऊन इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचे सांगत मुलाखती दिल्या होत्या. तसंच त्याने चांद्रयान-३ चं डिझाइन मीचं तयार केला असल्याचा देखील खोटा दावा केला होता. या व्यक्तीने इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहीमेमध्ये कोणतेही योगदान न देता खोटी माहिती परसरवली. ज्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा खराब झाली. यामुळे त्याच्याविरोधात सूरत पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
मितुल त्रिवेदी हा क्लासेस चालवतो अशी माहिती समोर आली आहे. अधिकाधिक विद्यार्थी मिळावेत म्हणून त्यांनी शास्त्रज्ञ असल्याचे सांगितले होते. मितुल त्रिवेदीने सायन्सऐवजी एम.कॉमची पदवी घेतली आहे. मितुलने इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याचे सांगत दस्तावेज कसे तयार केले याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी मितुल त्रिवेदीविरुद्ध भादंवि कलम ४६५, ४६८, ६७१ आणि ४१९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसओजी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.