

Chandrayaan 3 Update : ISRO चं चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं आहे. चांद्रयान 3 14 जुलै रोजी चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. महिनाभरानंतर चांद्रयानाने सोमवारी 14 ऑगस्ट रोजी चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला. आता चांद्रयान 150 किमी x 177 किमीच्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहे.
इस्रोने ट्वीट करत म्हटलं की, ' चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. चांद्रयान चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचलं आहे.
16 ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या आणखी या जवळ पोहोचेल. इस्रोने यापूर्वी एक पोस्ट देखील पोस्ट केली होती की, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 ते 12.30 च्या दरम्यान शेवटची परिक्रमा केल्यानंतर भारताचे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचेल. सध्या चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून 1437 किमी अंतरावर आहे. (Latest Marathi News)
चांद्रयान-३ मोहिमेचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. तीन टप्पे पूर्ण होताच, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होईल. यानंतर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू करेल. जर भारत यात यशस्वी झाला तर रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश बनेल. येत्या काही दिवसांत लँडिंगची जागा निश्चित केली जाईल.
मागील मोहिमेतील त्रुटी समजून घेण्यासाठी यावेळी शास्त्रज्ञांनी चांद्रयान-2 च्या लँडिंगच्या डेटाचा सखोल अभ्यास केला. जेणेकरून चांद्रयान-3 चे लँडिंग यशस्वीरित्या होऊ शकेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.