JKDFP: जम्मू-काश्मीरमधील जेकेडीएफ पक्षावर केंद्र सरकारची मोठी कारवाई, बेकायदेशीर संघटना म्हणून केलं घोषित

Central Government: जम्मू-काश्मीरमधील जेकेडीएफ पक्षावर केंद्र सरकारची मोठी कारवाई, बेकायदेशीर संघटना म्हणून केलं घोषित
Ministry of Home Affairs MHA
Ministry of Home Affairs MHA SAAM TV
Published On

Jammu and Kashmir Democratic Freedom Party:

केंद्र सरकारने गुरुवारी फुटीरतावादी नेता शब्बीर शहा याच्या जम्मू आणि काश्मीर डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टी (JKDFP) विरोधात मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जेकेडीएफपीला पाच वर्षांसाठी बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे.

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, सरकारने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) 1967 च्या कलम 3(1) अंतर्गत जेकेडीएफला बेकायदेशीर संघटना घोषित केले आहे. जेकेडीएफपीचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Ministry of Home Affairs MHA
Mega Block News: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! हार्बर मार्गावर पुन्हा पाच दिवसांचा ब्लॉक; पाहा नवीन वेळापत्रक

जेकेडीएफपीची स्थापना 1998 मध्ये शब्बीर अहमद शाह याने केली होती. शब्बीर हा भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक प्रचारासाठी ओळखला जाणारा प्रमुख फुटीरतावादी नेता आहे. शब्बीर शाह सध्या तुरुंगात आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी बोलताना केंद्र सरकारने सांगितलं आहे की, 1998 पासून त्यांच्या सदस्यांनी नेहमीच देशात फुटीरतावाद आणि दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले आहे. या संघटनेच्या सदस्यांना लोकांना भडकावून काश्मीरला वेगळे इस्लामिक राज्य बनवायचे आहे, जे भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेसाठी घातक आहे.

Ministry of Home Affairs MHA
Mahadev Betting App Case: मोठी बातमी! कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खानला ईडीने बजावलं समन्स

गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जेकेडीएफपीचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी कारवायांमध्ये आघाडीवर आहेत आणि त्यांना स्वतंत्र इस्लामिक राज्य निर्माण करायचे आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, "जेकेडीएफपीचे नेते किंवा सदस्य दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तान आणि त्याच्या प्रॉक्सी संघटनांसह विविध स्त्रोतांद्वारे निधी उभारण्यात गुंतलेले आहेत. ते जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर सतत दगडफेक करण्यासह बेकायदेशीर कारवाया करतात."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com