Mega Block News: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! हार्बर मार्गावर पुन्हा पाच दिवसांचा ब्लॉक; पाहा नवीन वेळापत्रक

Harbour Line Mega Block: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! हार्बर मार्गावर पुन्हा पाच दिवसांचा ब्लॉक; पाहा नवीन वेळापत्रक
Harbour Line Mega Block
Harbour Line Mega Blocksaam Tv
Published On

>> सिद्धेश म्हात्रे

Harbour Line Mega Block:

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा पाच दिवसांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यत हा वाहतुक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हा वाहतूक ब्लॉक मध्यरात्री 1:15 ते 4:45 पर्यंत साडे तीन तासांचा राहणार असल्याची माहिती, मध्य रेल्वेकडून देण्यात आलेय. पनवेल ईएमयू स्टेबलिंग साईडिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Harbour Line Mega Block
JKDFP: जम्मू-काश्मीरमधील जेकेडीएफ पक्षावर केंद्र सरकारची मोठी कारवाई, बेकायदेशीर संघटना म्हणून केलं घोषित

नवीन वेळापत्रक

मध्यरात्रीच्या या ब्लॉकमुळे 05/06.10.2023 (गुरुवार/शुक्रवार) ते 08/09.10.2023 (रविवार/सोमवार) च्या मध्यरात्री 01.15 वाजेपासून 4.45 वाजेपर्यंत (3.30 तासांसाठी) रेल्वे वाहतूक बंद असेल.

ब्लॉक कालावधीत 05/06.10.2023 (गुरुवार/शुक्रवार) ते 08/09.10.2023 (रविवार/सोमवार) मध्यरात्री तीन दिवस म्हणजे 01.15 ते 4.45 वाजेपर्यंत बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यानच्या उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन 05.10.2023 ते 08.10.2023 दरम्यान 23.14 वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि 00.34 वाजता पनवेलला पोहोचेल.

डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल 05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत ठाण्याहून 23.32 वाजता सुटेल आणि 00.24 वाजता पनवेलला पोहोचेल.

ट्रान्स-हार्बर शेवटची लोकल

05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत पनवेलहून यूपी ट्रान्स-हार्बर लाईनवरून सुटणारी शेवटची लोकल पनवेलहून 22.15 वाजता सुटेल आणि ठाण्याला 23.07 वाजता पोहोचेल.

Harbour Line Mega Block
Mahadev Betting App Case: मोठी बातमी! कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खानला ईडीने बजावलं समन्स

05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत ठाणे ते पनवेल या ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन ठाण्याहून 06.20 वाजता सुटेल आणि 07.12 वाजता पनवेलला पोहोचेल.

05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत अप हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन पनवेलहून 05.17 वाजता सुटेल आणि 06.36 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com