Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

New Labelling Rule for Personal-Care Products: केंद्र सरकारने नवीन लीगल मेट्रोलॉजीचे नियम लागू केलेत. साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीजवर शाकाहारी किंवा मांसाहारी चिन्ह देणं आवश्यक आहे.
Veg Non-veg Label On SOAP, Shampoo & Toothpaste
Veg Non-veg Label On SOAP, Shampoo & Toothpastesaam tv
Published On
Summary
  • साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीजवर व्हेज किंवा नॉन-व्हेज लेबल

  • उत्पादनांसाठी लाल किंवा तपकिरी ठिपका असणार आहे.

  • साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, इतर कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरीज या पॅकबंद उत्पादनांना हा नियम लागू होईल.

केंद्र सरकारने साबण, शम्पू तसेच अन्य सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरीज तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी एक नियम लागू केलाय. आता कंपन्यांना आपल्या प्रोडक्टवरती व्हेज आणि नॉन व्हेज असल्याचं माहिती नमूद करावी लागेल. एखादा खाद्यपदार्थ व्हेज आहे की नॉनव्हेज आहे? हे ओळखण्यासाठी हा नियम पाळला जातो. खाद्यपदार्थ व्हेज असेल तर हिरवा आणि नॉनव्हेज असेल लाल ठिपका अनेक फूड पॅकेटवर पाहायला मिळतो. परंतु आता हा नियम फक्त खाद्यपदार्थांपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये.

भारतात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर आता ती उत्पादने शाकाहारी आहेत की मांसाहारी, हे दर्शवणारे चिन्ह असणे अनिवार्य असेल. केंद्र सरकारनं २१ सप्टेंबर रोजी 'लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) फोर्थ अमेंडमेंट रूल्स, २०२६' (कायदेशीर मापनशास्त्र - पॅकबंद वस्तू - चौथी सुधारणा नियम, २०२६) अधिसूचित केले. हे नियम त्याच दिवसापासून लागू झाले आहेत.

Veg Non-veg Label On SOAP, Shampoo & Toothpaste
SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

ठिपक्यांचा नेमका अर्थ काय?

सुधारित नियमांनुसार,शाकाहारी उत्पादनांवर हिरवा ठिपका असेल. मांसाहारी उत्पादनांवर लाल किंवा तपकिरी ठिपका असेल. पॅकच्या मागील बाजूस कुठेतरी लपवलेल्या लहानशा घोषणेच्या विपरीत हे चिन्ह मुख्य डिस्प्ले पॅनलच्या वरच्या बाजूस लावणे आवश्यक असणार आहे. जेणेकरून ते खरेदीदारांना दिसेल. हा नियम साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, इतर सौंदर्य प्रसाधने आणि प्रसाधन सामग्रीला लागू असेल.

Veg Non-veg Label On SOAP, Shampoo & Toothpaste
दुचाकी चालकांसाठी सरकारची मोठी ऑफर; दररोज होणार कमाई, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल

केंद्र सरकारने पॅकेज्ड कॉस्मेटिक्स आणि संबंधित उत्पादनांच्या लेबल संदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. हे नवे नियम २१ सप्टेंबर २०२६ पासून लागू झालेत. याचा अर्थ असा की, वैयक्तिक निगा राखण्याचे एखादे उत्पादन शाकाहारी आहे की मांसाहारी, हे तपासणे आता खूपच सोपे होणार आहे.

हा खरोखरच एखादा नवीन नियम आहे का?

तसे नक्की नाहीये, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने आणि प्रसाधने (टॉयलेटरीज) यांच्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी असल्याची खूण (लेबलिंग) लावण्याची अशीच अट २०१४ मध्ये 'लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) रूल्स, २०११' मधील नियम ६(८) अन्वये लागू करण्यात आली होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या फेब्रुवारी २०२६ च्या आदेशात त्या आधीच्या तरतुदीचा आणि त्याबाबतच्या कायदेशीर आव्हानाचा उल्लेख करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com