SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

Central Government New Decision For SC -ST: SC आणि ST कुटुंबांसाठी केंद्र सरकारने गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदतीची व्याप्ती वाढवली आहे. आता 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे.
Central Government New Decision For SC -ST:
SC ST medical assistance income limit increased to Rs 5 lakhsaam tv
Published On

केंद्र सरकारने अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती मोठा दिलासा दिलाय. सरकारकडून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची व्याप्ती वाढवण्यात आलीय. आता पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या SC आणि ST कुटुंबांनाही या मदतीचा लाभ घेता येणार आहे.

Central Government New Decision For SC -ST:
LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

आधी हे सहाय्य केवळ ३ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) कुटुंबांनाच हा लाभ दिला जात होता. यासह हृदय, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया तसेच कर्करोग आणि इतर जीवघेण्या आजारांवरील उपचारांसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीतही वाढ करण्यात आली आहे. SC/ST समाज अनेक वर्षांपासून या वाढीची मागणी करत होता. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब यांसारख्या राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय.

Central Government New Decision For SC -ST:
EPFO 3.0 Big Update: PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 मध्ये UPI-ATMसह होणार ५ मोठे बदल; आता झटपट पैसे मिळणार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 'डॉ. आंबेडकर फाउंडेशन'ने 'डॉ. आंबेडकर वैद्यकीय मदत योजने'मध्ये २०१८ नंतर पहिल्यांदाच बदल करण्यात आलेत. ही आर्थिक मदत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या कुटुंबांना उपचारासाठी दिली जाते. या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांना एम्स (AIIMS) तसेच इतर सर्व सरकारी आणि सीजीएचएस (CGHS) मान्यताप्राप्त रुग्णालयांचा समावेश आहे.

या रुग्णालयाच्या खात्यात थेट निधी वितरित केला जातो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, संबंधित SC आणि ST कुटुंबांनी शस्त्रक्रियेच्या किमान पंधरा दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. २०१८ मध्ये जेव्हा या योजनेत सुधारणा करण्यात आली होती, तेव्हा आर्थिक मदतीसाठीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये २.५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाचा समावेश होता. ही योजना हृदय, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग, मूत्रपिंडावरील शस्त्रक्रिया, डायलिसिस आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत पुरवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com