६६१ कोटींचा सरकारी निधीचा घोटाळा; IAS आणि IFS अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

CBI Raid On IAS Officer Residence: सीबीआयच्या तपासात हरियाणा सरकारच्या आठ विभाग आणि चंढीगड प्रशासनाच्या दोन विभागातील निधीमध्ये घोटाळा झाला आहे. सीबीआय लवकरच याप्रकरणी चार्जशीट दाखल करू शकते.
CBI Raid On IAS Officer Residence
CBI officials conduct raids at multiple locations in connection with the alleged ₹661 crore government fund scamsaam tv
Published On
Summary
  • हरियाणा आणि चंदीगडमधील सरकारी विभागांमध्ये ६६१ कोटी रुपयांच्या निधी घोटाळा

  • सीबीआयने चंदीगड, पंचकुला आणि दिल्ली-एनसीआरमधील सहा ठिकाणी छापेमारी

  • आयएएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी शोधमोहीम

हरियाणा आणि चंढीगडमधील सरकारी विभागात ६६१ कोटी रुपयांचा निधी घोटाळा झाल्याचं उघडकीस आले आहे. याप्रकरणाचा तपास करताना सीबीआयने सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. यात चंढीगड, पंचकूला आणि दिल्ली-एनसीआरमधील सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ही छापेमारी आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एयू फायनान्स बँकेमार्फत सरकारी निधीत झालेल्या कथित अपहार प्रकरणी करण्यात आली आहे.

CBI Raid On IAS Officer Residence
२ कोटी कॅश, १३ फ्लॅट्स, ५ आलिशान घरं... सरकारी इंजिनिअरची 'काळी कमाई' पाहून अधिकारीही चक्रावले

या तपासात हरियाणा सरकारच्या आठ विभागांच्या आणि चंढीगड प्रशासनाच्या दोन विभागांच्या निधीमध्ये अनियमितता उघड झाली आहे. चंढीगड महानगरपालिका आणि क्रेस्ट चंढीगड यांच्या खात्यांमध्येही अनियमितता आढळून आली आहे. सीबीआयनं हरियाणा कॅडरचे वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिसराची आणि कंपनीचीही झडती घेतली. Vipam Consultancy Pvt. Ltd. आणि निदेशकांच्या परिसरातही तपासात करण्यात आला.

CBI Raid On IAS Officer Residence
IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई

सीबीआयच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्याविरुद्धातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने ३ आयएएस आणि १ आयएफएस अधिकाऱ्यासह अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापेमारी करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला नुकतीच खटला चालवण्याची परवानगी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

यानंतर सीबीआयचे पथक आयएएस अधिकारी मोहम्मद शायिन, पंकज अग्रवाल, प्रदीप कुमार आणि आयएफएस अधिकारी नवनीत कुमार यांच्या ठिकाणांवर पोहोचले. या अधिकाऱ्यांवर बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून सरकारी निधीचा गैरवापर आणि अपहार केल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com