खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे भारतासोबत राजकीय संबंधामध्ये तणाव निर्माण झालाय. हा तणाव अजून कायम आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी राजनैतिक अडथळ्यावर भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणाचे पुरावे जाहीर करावे असे आवाहन संजय कुमार यांनी ओटावाला केलेत.(Latest News)
भारतीय राजदूत संजय कुमार वर्मा यांनी शुक्रवारी कॅनेडियन प्लॅटफॉर्म, द ग्लोब आणि मेलला दिलेल्या मुलाखतीत टिप्पणी ही केली. कॅनडाने निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताला अद्याप कोणतेच ठोस पुरावे दाखवलेले नसल्याचे वर्मा या मुलाखतीत म्हणालेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये निज्जरच्या हत्येमध्ये "भारतीय सरकारच्या एजंटचा" असल्याचा आरोप केले होते. जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारतीय राजदुतांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप ‘मूर्ख आणि प्रेरित’असल्याचं फेटाळून लावले होते. त्यानंतर आता भारतीय राजदुतांनी कॅनडाकडे निज्जरच्या हत्येचे पुरावे मागितले आहेत.
परंतु कॅनडाकडून अजून कोणतेची ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. एका भारतीय उच्चायुक्ताने सांगितलं की, कॅनेडियन पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या निज्जरच्या हत्येच्या तपासावर पीएम ट्रूडो यांच्या विधानांमुळे नुकसान पोहोचले आहे. या हत्ये प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी आम्हाला कोणतीही विशिष्ट किंवा संबंधित माहिती दिली नसल्याचं भारतीय उच्चायुक्त वर्मा या मुलाखतीत म्हणालेत.
वर्मा यांनी मुलाखतीत बोलताना कॅनडाकडे हत्येचे पुरावे मागितले. पुरावे कुठे आहेत? तपासाचा निष्कर्ष काय आहे? का कदाचित उच्च स्तरावरून कोणीतरी भारतावर आरोप करण्यासाठी सांगितलं होतं का, असा सवाल भारतीय उच्चायुक्तांनी केला. निज्जरच्या हत्येत भारताचा कुठलाच सहभाग नसल्याचं म्हणत वर्मा म्हणाले की, राजदुतांचे संभाषण सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत सुरक्षित असते. ते न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकत नाही किंवा सार्वजनिकरित्या सोडले जाऊ शकत नाही.
तुम्ही बेकायदेशीर वायरटॅप्सबद्दल बोलत आहात, तुम्ही हे संभाषण कसे कॅप्चर केले ते मला दाखवा. दरम्यान वर्मा यांनी यावेळी सांगितलं की, भारताने ओटावाला पाच ते सहा वर्षात २६ वेळा विनंत्या केल्या होत्या की, कॅनडामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रत्यार्पण करावं. परंतु त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. भारत असून त्या कारवाईच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान वर्मा यांनी कॅनडामध्ये असलेल्या राजदुतांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केलीय. निज्जरच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर शिख्स फॉर जस्टिस (SFJ) गट आणि त्यांचे नेते गुरपतवंत सिंग पन्नून यांनी भारतीय राजदुतांना वारंवार धमक्या दिल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.