Hardeep Singh Nijjar News: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कॅनडातील सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वाराबाहेर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या टार्गेट शुटिंगमध्ये खलिस्तानी समर्थक निज्जरला अनेक गोळ्या लागल्या, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या केल्या माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
भारतीय एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड यादीत हरदीपसिंग निज्जरचा समावेश होता. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते.
निज्जरवर 10 लाखांचे बक्षीस होते
निज्जरचे नाव भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत होते. या यादीत अन्य 40 दहशतवाद्यांचेही नाव होते. निज्जरवर गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा (Crime News) कट रचल्याचा आरोप होता. या हत्याकांडानंतर त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणले. निज्जर हे या संस्थेचा प्रमुख होता.
खलिस्तान समर्थकांवर कारवाई
भारतीय एजन्सी सतत खलिस्तानी चळवळीवर काम करत असून, अलीकडेच वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल आणि त्याच्या सर्व समर्थकांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडा आणि इतर देशांतून काम करणाऱ्या खलिस्तान समर्थकांना मोठा धक्का बसला. अलीकडेच अमृतपालचा जवळचा सहकारी आणि खलिस्तान समर्थक अवतार सिंग खांडा याचाही रुग्णालयात मृत्यू झाला होता, खांडा यांचाही एनआयएच्या (NIA) वॉन्टेड यादीत समावेश होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.