Pune News: ISIS दहशतवादी मॉड्युल प्रकरणात 7 जणांवर आरोपपत्र दाखल

Pune News: इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवाया पुढे नेण्यासाठी प्रचार, प्रसार आणि निधी गोळा करण्याच्या प्रकरणातील दरशतवाद्यांवर मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल दाखल करण्यात आले आहे
Pune News
Pune NewsSaam Digital
Published On

Pune News

इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवाया पुढे नेण्यासाठी प्रचार, प्रसार आणि निधी गोळा करण्याच्या प्रकरणातील दरशतवाद्यांवर मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, कादिर दस्तगीर पठाण, सिमाब काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमील नचान, आकिफ नचान, मोहम्मद शहनावज आलम अशी या आरोपींची नावे आहेत.

इसिस या दहशतवादी संघटनेचे प्रचार आणि प्रसार करून देश विघातक कृत्य आणि दहशतवाद पसरवण्याचे काम हे सर्व आरोपी करत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. भारतात अनेक ठिकाणी दहशतवाद कृत्य करणे तसेच बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा मानस होता. तसेच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तेलंगणात जाऊन त्यांनी रेकी सुद्ध केली असल्याचे तपासातून समोर आले आहे. पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी जंगलात लपवून बसण्याचा डाव आखला होता तसेच त्यांना परदेशातून पैसे मिळत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातील काही दहशदवाद्यांवर एनआयएने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्य करण्याची योजना या आरोपींनी आखली होती. पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताचा कट आखला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com