हिंदू मुलीशी लग्न केल्याने मुस्लीम समाजातील मुलाच्या घरावर फिरवला बुलडोझर, हायकोर्टाकडून दिलासा

जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच तरुणाची तीन दुकाने आणि घर बुलडोझर फिरवून पाडले होते.
couple wedding
couple wedding SaamTv
Published On: 

मध्य प्रदेश : डिंडोरी जिल्ह्यात एका हिंदू मुलीचे मुस्लीम समाजातील मुलासोबत लग्न (hindu-muslim marriage) केल्याच्या विरोधात कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (high court) या प्रकरणात त्या मुलावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना (police) दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच त्या मुस्लीम समाजातील तरुणाची तीन दुकाने आणि घर बुलडोझर फिरवून पाडले होते.

couple wedding
दीड वर्षापूर्वी विवाह, घरातच आढळले पती-पत्नीचे मृतदेह; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

२२ वर्षीय साक्षीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत नमूद केले की, याचिकाकर्ता सज्ञान नागरिक आहे, जिने आसिफशी स्वेच्छेने लग्न केले आहे. मात्र, साक्षीचा भाऊ मोहित याच्या तक्रारीवरून डिंडोरी पोलिसांनी ४ एप्रिल रोजी आसिफविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. साक्षी ४ एप्रिल रोजी आसिफसोबत पळून गेली होती, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.