दीड वर्षापूर्वी विवाह, घरातच आढळले पती-पत्नीचे मृतदेह; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Crime News Updates
Crime News UpdatesSaam Tv
Published On: 

मेरठ: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमधील लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या (Lisari gate police station) हद्दीत शुक्रवारी पती-पत्नीचा मृतदेह (husband-wife dead body) सापडला होता. या घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आळी आहे. घरगुती वादातून दुकानदारानं पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. यानंतर त्यानं स्वतः गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वास्तविक, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिसाडी गेट परिसरात राहणारा शावेझ (३०) याचं किराणा मालाचं दुकान होतं. दीड वर्षापूर्वी शावेजचा विवाह मेरठच्या शाहपीर गेट येथील शीबा (वय २५) हिच्यासोबत झाला होता.

Crime News Updates
फडणवीस भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणाले, तरूण आमदारानं दाखवली चूक

घरात आढळले होते दोघांचे मृतदेह

शुक्रवारी सकाळपासून शावेझ याचे किराणा दुकान बंद होते, असे पोलिसांनी सांगितले. ग्राहक व शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी फोनही केले, पण कोणीच फोन उचलला नव्हता. त्यानंतर शेजाऱ्यांनी गच्चीतून घरात प्रवेश केला असता, खोलीत महिलेचा मृतदेह पडलेला दिसला आणि शावेजचा मृतदेह लटकलेला होता.

शीबा-शावेझचा दीड वर्षांपूर्वी झाला होता विवाह

पोलीस अरविंद चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शावेज आणि शीबा यांच्यात नेहमी भांडणं व्हायची. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. पती-पत्नी लिसाडी गेट परिसरात राहत होते. शावेझ याने भाड्याच्या घरात छोटे किराणा दुकान चालवण्यास सुरुवात केली होती. तर दुसरीकडे या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, मुलाकडील मंडळी लग्न झाल्यापासून हुंड्याची मागणी करत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. ३ महिन्यांपूर्वी मुलाकडील मंडळींची समजूत काढली होती. त्यानंतरही पती-पत्नीमधील वाद काही थांबले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.