सध्या सगळीकडे सनई-चौघड्यांचे सूर घुमतायत. लग्नाचा सीझन जोरात सुरू असताना चर्चा असते ती 'हळदी'च्या कार्यक्रमाची... मात्र याच हळदीच्या रंगात न्हाऊन निघणाऱ्या नवरदेव-नवरीला सावध करणारी बातमी समोर आलीये. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील कसरावदनगरमध्ये लग्नाआधी लावल्या जाणाऱ्या हळदीमुळे नवरीला आपला जीव गमवावा लागलाय. नेमकी ही घटना काय आहे पाहूयात..
खामखेडा येथे राहणाऱ्या राखीचे लग्न 26 एप्रिलला ठरले होते. लग्नाआधी 22 एप्रिलला हळदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राखीला हळद लावण्यात आली. हळद लावल्यानंतर लगेचच राखीची प्रकृती खालावू लागली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी राखीला इंदूरमधील एमवाय रुग्णालयात पाठवले. विशेष म्हणजे, एमवाय रुग्णालयाव्यतिरिक्त एका खाजगी रुग्णालयातही राखीवर उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच राखीचा मृत्यू झाला.
खरंतर, राखीच्या मृत्यूनंतर वऱ्हाडी मंडळींमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र, हळदीमुळे अशा पद्धतीने कुणाचा मृत्यू होऊ शकतो का, यावर तज्ज्ञांनी माहिती दिलीये. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त खवा, भेसळयुक्त पनीर, तेल आपण नेहमी ऐकतो..मात्र आता भेसळमाफियांनी आता हळदीतही भेसळ सुरू केली असून आता ही भेसळयुक्त हळद थेट जीवावर उठलीय. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. याचा चाप लावण्यासाठी हळद भेसळमाफियांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.