Sudha Murty Nominated To Rajya Sabha : ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड; PM मोदींनी केलं अभिनंदन

Sudha Murty Became MP (Member of Parliment) in Rajya Sabha : ज्येष्ठ लेखिका, इन्फोसिस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांची राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे
Senior writer Sudha Murthy appointed as Rajya Sabha MP
Senior writer Sudha Murthy appointed as Rajya Sabha MPSaam TV
Published On

Sudha Murty Nominated To Rajya Sabha:

ज्येष्ठ लेखिका, इन्फोसिस कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांचं अभिंदन केले आहे.

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. सुधा मुर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन..

"भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकन केल्याने मला आनंद होत आहे. राज्यसभेत जी. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या 'नारी शक्ती'चा एक शक्तिशाली पुरावा आहे, आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि सामर्थ्याचे उदाहरण देते. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Senior writer Sudha Murthy appointed as Rajya Sabha MP
Loksabha Election 2024: मोठी बातमी! भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार? दिग्गजांची धाकधुक वाढली

कोण आहेत सुधा मूर्ती? (Who Is Sudha Murthy)

सुधा मुर्ती या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. (Sudha Murty) तसेच त्या एक यशस्वी उद्योजिका, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

तसेच भारतातील सर्वात मोठी ऑटो मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग कंपनी असलेल्या टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला अभियंता आहेत. सुधा मूर्ती यांना मुलगी अक्षता मूर्ती आणि मुलगा रोहन मूर्ती अशी दोन मुले आहेत. अक्षता नारायण मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. तर रोहन मूर्ती हे मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया तसेच सोरोको या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टअपचे संस्थापक आहेत. (Latest Marathi News)

Senior writer Sudha Murthy appointed as Rajya Sabha MP
Buldana News : भरधाव ट्रक आणि टेम्पोची जोरदार धडक; भीषण अपघातात 2 ठार तर 2 गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com