Buldana News
Buldana NewsSaam TV

Buldana News : भरधाव ट्रक आणि टेम्पोची जोरदार धडक; भीषण अपघातात 2 ठार तर 2 गंभीर जखमी

Buldana Accident : जखमींना जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
Published on

संजय जाधव

Truck and Tempo Accident News :

बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ट्रक आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालाय. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य २ जण गंभीर जखमी आहेत.

Buldana News
Ac Local: मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, रेल्वेच्या चार ते पाच काचा फुटल्या; नेमकी काय आहे घटना?

मलकापूर तालुक्यातील तालसावाडा गावानजीक हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तेथे तात्काळ रुग्णवाहिका दाखल झाल्या. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघातामुळे रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मार्त पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अपघातग्रस्त वाहनांना देखील बाजूल केले आहे, त्यामुळे आता वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे सध्या काम सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. तालसावाडा जवळ सुद्धा एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे ही दोन्ही जात असताना समोरासमोर येऊन एकमेकांना धडकली आहेत. या अपघातामुळे मार्गावरील बऱ्याचवेळ वाहतूक खोळंबली होती.

फोंडा घाटात भीषण अपघात

काल फोंडा ते दाजीपूर मार्गावर देखील भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात आलेला एक 18 चाकी कंटेनर रस्त्यामध्येच उलटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Buldana News
Phonda Ghat Accident News : फाेंडा घाटात भीषण अपघात, जाणून घ्या वाहतुकीची स्थिती (Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com