Loksabha Election 2024: मोठी बातमी! भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार? दिग्गजांची धाकधुक वाढली

Maharashtra Politics: लोकसभेत ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपने प्रत्येक जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळेच निवडून येण्याची खात्री असलेल्या मजबूत उमेदवारांची पक्षाला आवश्यकता आहे.
Maharashtra Politics BJP Sitting MP's candidacy May Be Cancelled Loksabha Election 2024
Maharashtra Politics BJP Sitting MP's candidacy May Be Cancelled Loksabha Election 2024SAAM TV
Published On

सुरज मासुरकर, मुंबई|ता. ८ मार्च २०२४

Loksabha Election 2024:

एकीकडे महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षामधील अनेक विद्यमान खासदारांचा लोकसभेतून पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

भाजपच्या नेतृत्वाकडून भाजपच्या राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. या सर्वेमध्ये अनेक खासदारांची पाच वर्षांची कामगिरी समाधान कारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अशा खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिग्गजांचा पत्ता कट होणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभेची उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली याबाबतचा निकष भाजप पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यासमोर ठेवण्यात आला. अशातच भाजप नेतृत्वाने केलेल्या सर्वेमधून काही खासदारांची कामगिरी समाधान कारक नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळेच अशा खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन दिवसात भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी येऊ शकते. यामध्ये अनेक नवे चेहरे असण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेच्या बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, अहमदनगर, वर्धा, रावेर, या जागांवरील भाजप उमेदवार बदलले जाण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra Politics BJP Sitting MP's candidacy May Be Cancelled Loksabha Election 2024
Pune-Nashik Highway : पुणे-नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात होणार घट, ग्रामीण रुग्णालय-ट्रॉमा सेंटरला मंजुरी

दरम्यान, लोकसभेत ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपने प्रत्येक जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळेच निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची पक्षाला आवश्यकता आहे. तसेच स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे दिग्गजांचा पत्ता कट होणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics BJP Sitting MP's candidacy May Be Cancelled Loksabha Election 2024
Women's Day Special Story : पॅड वुमन्सची महाराष्ट्रभर चर्चा; व्यवसायातून कमवतायत लाखो रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com