Women's Day Special Story : पॅड वुमन्सची महाराष्ट्रभर चर्चा; व्यवसायातून कमवतायत लाखो रुपये

Pad Women : मनिषा राठोड एका आश्रम शाळेवर शिक्षिका म्हणून काम करायच्या. नोकरीमधून मिळणाऱ्या पगारावर त्या खूश नव्हत्या. शिवाय काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न त्या पाहत होत्या.
Women's Day Special Story
Women's Day Special StorySaam TV
Published On

Sanitary Pad Business :

महिलांना येणाऱ्या मासिक पाळीबाबत साल २०१८ मध्ये अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर सर्वत्र महिलांनी मासिक पाळीवेळी पॅड वापरणे किती आवश्यक आहे याची जनजागृती करण्यात आली. पॅडमॅन प्रमाणेच आता नांदेडमध्ये पॅडवुमन चर्चेत आल्या आहेत. या महिलांनी पॅड विक्रीच्या व्यवसायातून लाखो रुपये कमवले आहेत.

Women's Day Special Story
Business Ideas: नोकरीच्या कटकटीतून व्हा मुक्त! कमी खर्चात व्यवसाय करुन हजारो रुपये कमवा

घरी हालाखीची परिस्थिती मात्र मनात काहीतरी करण्याची जिद्द. त्यामुळे मनिषा राठोड आणि सत्यभामा राठोड या दोन मैत्रिणींनी एकत्र येत पॅड बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी त्यांनी कुठलंही कर्ज (Loan) घेतलं नव्हतं. मेहनतीने आणि जिद्दीने दोघींनी आतापर्यंत या व्यवसायातून मोठं नाव कमावलं आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याला तब्बल १ लाख रुपयांचा नफा होत आहे.

मनिषा राठोड एका आश्रम शाळेवर शिक्षिका म्हणून काम करायच्या. नोकरीमधून मिळणाऱ्या पगारावर त्या खूश नव्हत्या. शिवाय काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न त्या पाहत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णयघेतला. नोकरी सोडून त्यांनी सॅनिटरी पॅड बनवण्यास सुरूवात केली.

सत्यभामा यांना देखील या व्यवसाया बद्दल माहिती दिली. त्यानंतर दोन्ही मैत्रिणींनी गाव सोडून नांदेड शहरात सत्यमणी हायजेनिक प्रोडक्टस नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीने आता राज्यभरात मोठं नाव कमवलं आहे.

कंपनीमध्ये सुरुवातीला या दोघींनी 40 लाख रुपऐ खर्च केला आणि सॅनिटरी पॅड तसेच नॅपकिन बनवण्याची मशीन खरेदी केली. त्यानंतर शहरातील पु्यनी रोड जवळ त्यांनी ही कंपनी सुरु केली. या व्यवसायासाठी लागणारा पैसा त्यांनी स्वत: उभा केला होता. यासाठी कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यात आलेले नाही.

मनिषा राठोड आणि सत्यभामा राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवसायासाठी त्या ऑर्डरप्रमाणे माल तयार करतता. तयार माल त्या स्वतः बाजारात जाऊन विकतात. त्यामुळे महिण्याला त्यांना एक लाख रुपये इतका नफा होतो.

Women's Day Special Story
Crime News: साडेतीन वर्षाच्या बालकाला पाण्यात फेकलं; 'मृत्यू'चा थरार सिसिटीव्हीमध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com