सेक्सनंतर बॉयफ्रेंडने केलं ब्लॉक, गर्लफ्रेंडलाच झाली अटक; वाचा काय घडलं

एवढेच नाही तर महिलेने त्याच्यावर बलात्कार, अत्याचार असे गंभीर आरोपही केले.
सेक्सनंतर बाॅयफ्रेंडनेच केलं ब्लॉक, गर्लफ्रेंडलाच झाली अटक; वाचा काय घडलं
सेक्सनंतर बाॅयफ्रेंडनेच केलं ब्लॉक, गर्लफ्रेंडलाच झाली अटक; वाचा काय घडलं Saam TV
Published On: 

ऑस्ट्रेलियातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका महिलेवर तिच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वास्तविक, महिलेला तिच्या बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर शारिरीक ठेलल्यानंतर ब्लॉक केले होते. यामुळे महिलेला इतका राग आला की तिने प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर महिलेने त्याच्यावर बलात्कार, अत्याचार असे गंभीर आरोपही केले.

महिलेला अटक

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महिलेने प्रियकरावर बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप केला आहे. मात्र, हे प्रकरण अॅडलेड जिल्हा न्यायालयात (Court) पोहोचल्यावर न्यायालयाने तिच्या प्रियकराला निर्दोष घोषित केले. मात्र प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली.

सेक्सनंतर बाॅयफ्रेंडनेच केलं ब्लॉक, गर्लफ्रेंडलाच झाली अटक; वाचा काय घडलं
आर्यलँडच्या फलंदाजाने बनवल्या 12 चेंडूत 54 धावा; अमेरिका पराभूत

पैसे चोरल्याचाही आरोप

माहितीनुसार, महिलेने आरोप केला होता की तिच्या प्रियकराने 2017 मध्ये अॅडलेडमधील एका बार आणि स्ट्रिप क्लबमध्ये तिच्या परवानगीशिवाय तिचे डेबिट कार्ड वापरून $600 किंवा सुमारे 45 हजार रुपये खर्च केले होते.

महिलेने बलात्कार केल्याचा दावा केला

महिलेने दावा केला आहे की तिने दारू खरेदी करण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला होता. दारूच्या नशेत महिलेवर बलात्कार करता यावा म्हणून त्याने दारू विकत घेतली. महिलेने कोर्टासमोर सांगितले की, 'माझ्या संमतीने सेक्स केला गेला नाही. माझ्यावर बलात्कार झाला आहे.

बॉयप्रेंडने आणि त्याच्या कुटुंबाला धमक्या दिल्या

रिपोर्ट्सनुसार, महिलेच्या प्रियकराला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र एक दिवस सेक्स केल्यानंतर त्याने महिलेला सोशल मीडियावर (Social Media) ब्लॉक केले. यानंतर महिलेला राग आला. यानंतर तिने त्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एवढेच नाही तर महिलेने फेसबुकवर फेक प्रोफाईल वापरून पुरुष मित्र तसेच त्याच्या कुटुंबीयांचा छळ, छेडछाड आणि जीवे मारण्याच्या अनेक धमक्या दिल्या. महिलेने अनेक धमकावणारे मेसेज पाठवले तर खूनाच्या घटनेतील फोटो पाठवले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.