

आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील 2 सामन्यांची T20 मालिका अनिर्णित राहिली. दुसऱ्या T20 मध्ये आयर्लंडने अमेरिकेचा 9 धावांनी पराभव केला. तर पहिल्या T20 मध्ये अमेरिकेने आयर्लंडला 26 धावांनी धुव्वा उडवला होता. आयर्लंडचा संघ सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. मालिका पराभव टाळण्यासाठी आयर्लंडसमोर दुसरी टी-20 जिंकण्याचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत त्यांच्या 25 वर्षीय फलंदाजाने कमान सांभाळली, ज्याने केवळ 12 चेंडूत 54 धावा करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.
या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी केली. आयरिश संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 18.5 षटकांत 150 धावा करून सर्वबाद झाला. आयर्लंडकडून लॉर्कन टकरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 56 चेंडूत 84 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. म्हणजेच त्याच्या डावात 54 धावा फक्त 12 चेंडूत मारल्या. 9 चौकारांसह 36 धावा आणि 3 षटकारांसह 18 धावा केल्या.
22 वर्षीय गोलंदाजाने अमेरिकेला पराभवाच्या खाईत ढकलला
अमेरिकेसमोर टी-20 मालिका (T-20 Series) जिंकण्यासाठी 151 धावांचे लक्ष्य होते. मात्र या लक्ष्यासमोर अमेरिकेचा संघ 20 षटकांत 7 बाद 141 धावा करत थांबला. अमेरिकेच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत होत्या, ज्याचा फटका त्याला सहन करावा लागला. संघाकडून सुशांत मोदानीने 16 चेंडूत सर्वाधिक 27 धावा केल्या. अमेरिकेची (America) अवस्था इतकी बिकट करण्यात आयर्लंडच्या 22 वर्षीय अष्टपैलू कर्टीस केम्पफरची भूमिकाही महत्त्वाची होती, ज्याने चेंडूने 4 फलंदाजांना बाद केले. त्याने 4 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले.
आता टी-20 नंतर वनडे मालिका होणार आहे
25 वर्षीय लोर्कन टकरच्या नेतृत्वाखाली आयर्लंडने 9 धावांनी सामना जिंकला. टकरला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरविण्यात आले. त्याने मालिकेतील 2 सामन्यात 2 अर्धशतके ठोकत 141 धावा केल्या आहेत. आता 26 डिसेंबरपासून आयर्लंड आणि अमेरिका यांच्यात 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 28 डिसेंबर रोजी होणार आहे. तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना ३१ डिसेंबरला होणार आहे. यानंतर आयर्लंडचा वेस्ट इंडिज दौरा सुरू होईल.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.