मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यासहित भाजपच्या महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात; घटनास्थळी तगडा बंदोबस्त, VIDEO

women reservation bill : दिल्ली पोलिसांनी केंद्रीय मंत्र्यासहित भाजप खासदारांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही महिला नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
women reservation bill news
bjp news Saam tv
Published On
Summary

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याने राजकीय वातावरण तापलं

भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या घराबाहेर आंदोलन

आंदोलन प्रकरणी भाजपच्या महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेत शुक्रवारी महिला आरक्षण विधेयक पडलं. त्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप खासदारांनी आंदोलन करून विरोधकांवर टीका केली. त्यानंतर आज शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणे भाजपच्या महिला नेत्यांना भोवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतलं आहे.

लोकसभेत मोदी सरकारने शुक्रवारी तीन विधेयके पटलावर मांडली होती. यातील १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या विधेयकासाठी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मतदान पार पडलं. मोदी सरकारला हे विधेयक पास करण्यासाठी दोन तृतियांश मतांची गरज होती. परंतु विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली. तर या विधेयकाच्या विरोधात २३० मते पडली. त्यामुळे हे विधेयक संसदेत नामंजूर झालं. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर इतर दोन विधेयके सरकारने मागे घेतली. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली.

भाजपने काल विधेयकावरून राष्ट्रव्यापी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर भाजपच्या महिला नेत्यांनी आज शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. भाजपच्या महिला नेत्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा रस्त्यावर जाळला. यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपच्या महिला कार्यकर्त्या काळे झेंडे घेऊन राहुल गांधी यांच्या घराबाहेर पोहोचल्या होत्या. या आंदोलनाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

women reservation bill news
Maharashtra News Live Update: जामनेर रोडवरील दुकानासमोर उभी असलेल्या रिक्षाने घेतला अचानक पेट

परंतु राहुल गांधी यांच्या घराबाहेर आंदोलन करणे भाजपच्या महिला नेत्यांना भावलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्यासहित भाजप खासदार बन्सुरी स्वराज, खासदार कमलजीत सेहरावत यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेत असतानाही भाजप खासदार, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या जमल्या होत्या. परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलनावर नियंत्रण मिळवलं. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन होत असताना राहुल गांधी हे निवडणुकीसाठी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. या आंदोलनावर राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com