

भाजपने पंजाबमध्ये 'आप'वर राजकीय दबाव वाढवलाय
राज्यसभेत भाजपची संख्या वाढल्यामुळे एनडीए मजबूत
पंजाबमध्ये 'आप'मध्ये फुट पडल्याने पक्षाची स्थिती कमकुवत
पश्चिम बंगालच्या निवडणुकीदरम्यान भाजपने पंजाबमध्ये मोठी संधी साधली आहे. आम आदमी पक्षात फूट पाडून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपने आम आदमी पक्षाला पंजाबमध्येच झटका दिला. त्यानंतर पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी सत्तेवर येण्यासाठी दावेदारी उघड केली आहे. दुसरीकडे भाजपच्या खेळीने राज्यसभेत एनडीएची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे राज्यसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या आता ११३ इतकी होणार आहे.
भारतीय राजकारणात पंजाब आणि पश्चिम बंगालचं महत्व वाढू लागलं आहे. या दोन्ही राज्यात भाजपची ताकद कमी आहे. या राज्यात ताकद वाढवण्यासाठी भाजपला फार उशीर लागला. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपने आता पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षात फूट पाडून भाजपने पंजाबमध्ये राजकारणाला सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये आणखी काही दिवसांनंतर आणखी मोठं ऑपरेशन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ऑपरेशनने पंजाबमधील संपूर्ण सत्ता समीकरण बदलू शकते, असं सांगण्यात आलं आहे. यामुळे आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारला सावध राहावे लागणार आहे, असा संदेश त्यांचे नेते देऊ लागले आहेत.
भाजपने 'आप'मध्ये फूट पाडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं खच्चीकरण देखील केलं आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे १० खासदारांपैकी तब्बल ७ खासदार भाजपमध्ये गेले आहेत. ७ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यसभेतील सदस्यांची संख्या १०६ वरून ११३ इतकी झाली आहे. तर एनडीएच्या सदस्यांची संख्या १३४ वरून १४१ इतकी झाली आहे. 'आप'चं लोकसभेतही टेन्शन वाढलं आहे. लोकसभेतील ३ पैकी २ खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.