

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मध्यप्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा काबिज करण्यासाठी भाजपने रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. या राज्यातील निवडणुकीत भाजप थेट केंद्रीय मंत्र्यांनाच आमदारकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी नुकतीच राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा यांची देखील उपस्थिती होती. बैठकीत मध्यप्रदेशप्रमाणे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये देखील भाजप केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवण्याबाबत चर्चा झाली. (Latest Marathi News)
विशेष बाब म्हणजे, यापूर्वी भाजपने मध्यप्रदेशात नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंग कुलस्ते या तीन केंद्रीय मंत्र्यांना तसेच चार विद्यमान खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये देखील भाजप आणखी काही केंद्रीय मंत्र्यांना तसेच खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांना तसेच खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरुन भाजपला काय फायदा होणार? जाणून घेऊया थोडक्यात.
मध्यप्रदेशात कमलनाथन यांचा वर्षभराचा कालावधी सोडला. तर सलग दोन दशकं भाजप सत्तेत आहे. शिवराज सिंह चौहान यांनाच भाजपने मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. अशातच मध्यप्रदेशात मध्यंतरी घडलेल्या विविध मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं. त्यामुळे प्रस्थापित सरकारविरोधात नाराजीची लाट येऊन नये म्हणून मोठे चेहरे निवडणुकीत उतरवून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो.
जात प्रबळ असलेले मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपची ही रणनिती असू शकते. कारण, गेल्या काही दिवसांपासून भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देत असल्याने इतर जातीतील मतदारांनी भाजपवर नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात ज्यांची जात प्रबळ त्या मतदारसंघात खासदारांना निवडणुकीत उभे केले जाऊ शकते.
जितके मोठे चेहरे या निवडणुकीत उतरणार तितकीच मुख्यमंत्रीपदासाठी चुरस निर्माण होणार, भाजपकडे असे अनेक केंद्रीय मंत्री आहेत. ज्यांनी राज्याचं नेतृत्व करावं, अशी मतदारांची इच्छा आहे. त्यामुळे या नेत्यांना जर निवडणुकीच्या मैदानात उतरवलं, तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मतदार मतदान करतील, याचा भाजपला थेट फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपकडून जशी लोकसभेची निवडणूक लढवली जाते. तशी विधानसभेची देखील निवडणूक लढवून राज्यात सत्ता आणली जाईल, असा विश्वास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी ही रणनिती आखल्याचं सांगितलं जातंय.
ज्या विधानसभा जागेवर भाजपचा उमेदवार कमकुवत आहे. तसेच जिथे भाजपला आपलं वर्चस्व निर्माण करता आलं नाही. अशा मतदारसंघात केंद्रीय मंत्री किंवा खासदाराला उभे करुन तो मतदारसंघ काबिज करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो.
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत बहुमत मिळवून देण्यासाठी भाजपला सर्वात आधी राज्यांमध्ये सरकार स्थापनेवर भर द्यावा लागणार आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता त्या ठिकाणाहून भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येऊ शकतात.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.