आधी लाठ्या काठ्यांनी मारहाण, नंतर गोळी झाडली; भाजप नेत्याच्या भावाची हत्या, राजकारणात खळबळ

BJP Leader Brother Vijay Singh Killed In Guna Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात कौटुंबिक वादातून भाजप नेते वीर बहादूर सिंह सारेठा यांच्या धाकट्या भावाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
BJP LEADER’S BROTHER SHOT DEAD IN GUNA
BJP LEADER’S BROTHER SHOT DEAD IN GUNAsaam tv
Published On: 

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यात असलेल्या सारेठा गावात कौटुंबिक वादातून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशचे जिल्हा मंत्री वीर बहादूर सिंह सारेठा यांचे धाकटे बंधू विजय सिंह यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

BJP LEADER’S BROTHER SHOT DEAD IN GUNA
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधातील याचिकेवर दिवाळीनंतर निर्णय, कोर्टाने नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सारेठा गावातील रहिवासी विजय सिंह हे त्यांचा पुतण्या शांतनू शेतावर जात होते. यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या भारत यादव आणि त्याचा मुलगा विशाल यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीनी सर्वात आधी काठीने मारहाण करून शांतनू याला जखमी केले. त्यानंतर विशाल याने बंदुकीतून विजय सिंह यांच्या डाव्या पायावर गोळी झाडली. गोळी लागल्याने विजय सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

BJP LEADER’S BROTHER SHOT DEAD IN GUNA
सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी! 20 जागा, पगार तब्बल 2 लाख; कोण करू शकतं अर्ज?

घटनेनंतर सिरसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपी भारत सिंह आणि त्याचा मुलगा विशाल यांना अटक केली आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेली बंदूक बेकायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

BJP LEADER’S BROTHER SHOT DEAD IN GUNA
Loksabha Election | भारतातली पहिली लोकसभा निवडणूक कशी होती? किती पक्ष होते तेव्हा? | Marathi News

या हत्येमागे कौटुंबिक वाद आणि जुनी वैयक्तिक दुश्मनी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्यामागील कारण, वापरण्यात आलेले शस्त्र आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com