BJP Workers Protest In Patna : बिहारमध्ये पोलिसांचा लाठीमार, आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्याचा मृत्यू

Bihar BJP leader killed in police lathicharge : बिहार विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.
Bihar BJP leader killed in police lathicharge
Bihar BJP leader killed in police lathichargeSAAM TV
Published On

Bihar BJP leader killed in police lathicharge During protests : बिहार विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात जखमी झालेल्या भाजप नेत्याचा मृत्यू झाला.

पाटणा येथील डाकबंगला परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात बळाचा वापर केला. लाठिमारात जखमी झालेल्या जहानाबाद नगरचे भाजपचे महामंत्री विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला.

शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर भाजप नेते (BJP Leader) आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी आंदोलन केले. डाकबंगला परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लाठिमारात जहानाबाद नगरचे भाजप महामंत्री विजय कुमार सिंह जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथील डॉक्टरांनी विजय यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर बिहारचं राजकारण तापलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या घटनेवरून नितीश कुमार सरकारला घेरलं आहे.

Bihar BJP leader killed in police lathicharge
Greater Noida Galaxy Plaza Fire: दिल्लीमध्ये गॅलक्सी मॉलला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी तिसऱ्या मजल्यावरुन मारल्या उड्या

जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत बिहार सरकारवर टीका केली आहे. भाजप कार्यकर्त्यांवर पाटणा येथे लाठीमार करण्यात आला. राज्य सरकारचं अपयश आणि त्यांच्या त्राग्याचे हे परिणाम आहेत. महाआघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या किल्ल्याला वाचवण्यासाठी लोकशाहीवर हल्ला करत आहे. ज्या व्यक्तीविरोधात आरोपपत्र दाखल झालं, त्याला वाचवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नैतिकता देखील विसरले आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजप नेते सुशील मोदी म्हणाले की, पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर विजय कुमार सिंह हे खाली कोसळले. त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांना वाचवता आले नाही.

Bihar BJP leader killed in police lathicharge
Delhi Flood Update: दिल्लीला पुराचा वेढा; यमुना नदीनं मोडला 45 वर्षांचा रेकॉर्ड, फक्त कार नाहीत, तर बस-ट्रकही बुडाल्या

शिक्षक नियुक्तीच्या मुद्यावर सरकारविरोधात मोर्चा

तत्पूर्वी, गुरुवारी विधानसभेत या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. भाजपच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपच्या दोन आमदारांना मार्शलने उचलले आणि विधानसभेतून बाहेर काढले. त्यानंतर मोर्चा काढलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com