Delhi Fire News: राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये एका मॉलला भीषण आग (Delhi Mall Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील गॅलेक्सी प्लाझामध्ये (Galaxy Plaza) ही भीषण आग लागली. जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. या मॉलमध्ये काही लोक अडकली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशम दलाचे जवान (Fire Brigade Jawan) घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडातील बिसराख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौर सिटी वन फर्स्ट एव्हेन्यूमधील गॅलेक्सी प्लाझा या मॉलला गुरुवारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे कळताच या मॉलमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी काही नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या.
मॉलमध्ये अडकलेले नागरिक खिडकीच्या माध्यमातून खाली उडी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मॉलमध्ये अनेक लोकं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मॉलमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आग लागलेल्या गॅलेक्सी प्लाझामध्ये 170 हून अधिक दुकाने आहेत. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अॅनिमेशनचे काम करणाऱ्या स्टुडिओला आग लागली आहे. शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे. या स्टुडिओच्या आसपास असलेल्या दुकानांचेही नुकसान झाले आहे. स्टुडिओ पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
या स्टुडिओमध्ये ५ लोकं होती. एक मुलगी आणि मुलाने आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीत येऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या. पण ग्रीलला आदळल्यामुळे यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. तर मुलगी देखील जखमी झाली आहे. तर धुरामुळे तिघांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. असे सांगितले जात आहे की, स्टुडिओच्या एन्ट्री गेटजवळ एसी बसवण्यात आला होता. लाकडी गेटला आग लागली. यानंतर तरुण आणि तरुणीने जीव वाचवून खिडकीतून खाली उडी मारली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.