दिल्लीमध्ये भाजपची डिनर डिप्लोमसी! डझनभर खासदारांना बोलावलं, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

BJP Dinner Diplomacy: संसदेच्या अधिवेशनाआधी भाजपची दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी सुरू झाली आहे. विविध राज्यांतील खासदारांसाठी केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी स्वतंत्र बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
BJPDinnerDiplomacy
BJPDinnerDiplomacysaam tv
Published On: 

संसदेच्या आधिवेशन सुरू होण्याआधी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सोमवारपासून संसदेच्या कामकाजाला सुरुवात होणार असल्याने भाजपने रविवारी रात्री आपल्या खासदारांसाठी डिनर आयोजित केले आहे. विविध राज्यातील खासदारांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

BJPDinnerDiplomacy
Sanjay Raut On Modi | इंदापुरातील मेळाव्यातून राऊतांचा भाजप- मोदींवर हल्लाबोल! | Marathi News

कोणत्या राज्यातील खासदारांची बैठक कुठे होणार?

भाजपने राज्य आणि विभागनिहाय खासदारांच्या बैठकांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली आहे. ईशान्येकडील राज्यांतील खासदारांसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या निवासस्थानी डिनर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील खासदार केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांच्या निवासस्थानी एकत्र येणार आहेत. मध्य प्रदेशातील खासदारांसाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या घरी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. तर छत्तीसगडमधील खासदार केंद्रीय मंत्री तोखनू साहू यांच्या निवासस्थानी जमणार आहेत.

BJPDinnerDiplomacy
Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

हरियाणा आणि दिल्लीतील खासदारांसाठी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या घरी बैठक होणार आहे. यावेळी खट्टर खासदारांशी सोमवारच्या संसदीय कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत. तसेच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील खासदार केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी डिनरसाठी एकत्र येणार आहेत. तर याधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तयांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिवेशनासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या अधिवेशनात भाजपकडून डिलिमीटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयके मंजूर करून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.