भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

BJP AAP Political Equation In Rajasthan Pidawa Municipality: राजस्थानच्या पिडावा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राजू माळी विजयी झाले. काँग्रेसने सर्वाधिक 8 जागा जिंकल्या असतानाही भाजपला ‘आप’च्या नगरसेवकांचा आणि एका अपक्षाचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचा उमेदवार 4 मतांनी विजयी झाला.
BJP AAP political equation in Rajasthan Pidawa municipality
BJP AAP political equation in Rajasthan Pidawa municipalitysaam tv
Published On

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्ष आणि भाजप दिल्ली, पंजाब, गोवा, गुजरातसह देशभरात एकमेकांचे कट्टर विरोधक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता फारच कमी मानली जाते. मात्र, राजस्थानमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाल आहे. जयपूरपासून सुमारे 380 किलोमीटर अंतरावर असलेल्या झालावाड जिल्ह्यातील पिडावा नगरपालिकेत भाजपने 'आप' च्या नगरसेवकांच्या मदतीने काँग्रेसलाच सत्तेपासून दूर ठेवल आहे. विशेष म्हणजे कॉँग्रेस सर्वाधिक जागा जिंकूनही अखेर सत्तेबाहेर ठेवले आहे. विशेष म्हणजे कॉँग्रेस सर्वाधिक जागा जिंकूनही अखेर सत्तेबाहेर राहिली.

BJP AAP political equation in Rajasthan Pidawa municipality
भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

राजस्थानमधील ३०९ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं काही ठिकाणी चांगली कामगिरी केली. बारां नगर परिषदेत ‘आप’ बहुमताच्या जवळ पोहोचली. त्यानंतर शीतल राठौर यांनी सभापतीपदाची निवडणूक जिंकत राजस्थानमध्ये पहिल्यांदाच एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ‘आप’ची सत्ता स्थापन केली. तर दुसरीकडे झालावाड जिल्ह्यातील पिडावा नगरपालिकेत ‘आप’ने पाच जागा जिंकत सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.

BJP AAP political equation in Rajasthan Pidawa municipality
Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

पिडावा नगरपालिकेत एकूण २० जागा आहेत. यापैकी काँग्रेसने सर्वाधिक ८ जागा जिंकल्या. भाजपचे ६ नगरसेवक विजयी झाले, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताचा आकडा गाठेल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपचे उमेदवार राजू माळी यांनी बाजी मारली. ‘आप’च्या पाच नगरसेवकांसह एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाल्याने राजू माळी यांचा चार मतांनी विजय झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com