मोठी बातमी! 6 आमदारांचं तडकाफडकी निलंबन; राज्याच्या राजकारणाला हादरा

Bjd Suspends 6 Mlas Cross Voting Odisha: राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे बीजेडीने सहा आमदारांना तात्काळ निलंबित केले. नवीन पटनायक यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
BJD Chief Naveen Patnaik takes strict action against six party MLAs over cross-voting in Odisha political row
BJD Chief Naveen Patnaik takes strict action against six party MLAs over cross-voting in Odisha political rowSaam Tv
Published On

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंगसह पक्षविरोधी कारवाई केल्याने बिजू जनता दलाने (बीजेडी) पक्षातील सहा आमदारांना तात्काळ निलंबित केले आहे.

निलंबित आमदारांची नावे खालीलप्रमाणे

चाकरमणी कन्हार – बालीगुडा विधानसभा

नबा किशोर मल्लिक- जयदेव विधानसभा

सौविक बिस्वाल- चौद्वार-कटक विधानसभा

सुबासिनी जेना- बास्ता विधानसभा

रमाकांत भोई- तिर्तोल विधानसभा

देवी रंजन त्रिपाठी- बांकी विधानसभा

BJD Chief Naveen Patnaik takes strict action against six party MLAs over cross-voting in Odisha political row
BJD Chief Naveen Patnaik takes strict action against six party MLAs over cross-voting in Odisha political rowSaam tv

या आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय बीजेडीच्या बैठकीत घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या बैठकीचे अध्यक्ष होते. या सहा आमदारांना १७ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी शुक्रवार संध्याकाळपर्यंत आपली उत्तरे सादर केली. मात्र, ही उत्तरे समाधानकारक आढळली नाहीत, असे बीजेडीच्या मुख्य प्रतोद प्रमिला मल्लिक यांनी सांगितले.

BJD Chief Naveen Patnaik takes strict action against six party MLAs over cross-voting in Odisha political row
रस्त्यावर स्टंट करणंं महागात पडलं; रील बनवताना भाजपच्या दिग्गज नेत्याच्या मुलाचा जागीच मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने चारपैकी दोन राज्यसभा जागा जिंकल्या. तर, विरोधी पक्ष बीजेडी आणि भाजप-समर्थित अपक्ष उमेदवाराला प्रत्येकी एक जागा मिळाली. ओडिसा विधानसभेत एकूण १४७ सदस्य आहेत. सत्ताधारी भाजपला पाठिंबा देणारे आमदार आणि अपक्ष आमदारांची संख्या ८२ होती. परंतु राज्यसभा निवडणुकीत, भाजपच्या उमेदवारांना प्रथम पसंतीची एकूण ९३ मते मिळाली, जी त्यांच्या वास्तविक संख्येपेक्षा ११ ने जास्त होती.

या ११ अतिरिक्त मतांपैकी आठ मते बिजू जनता दल (बीजेडी) च्या आमदारांची आणि तीन मते काँग्रेसच्या आमदारांची होती. यानंतर नवीन पटनायक यांनी या आमदारांना निलंबित करणार असल्याचा इशारा देखील दिला होता. या पार्श्वभूमीवर आज बीजेडीची बैठक पार पडली आणि यामध्ये आमदारांना निलंबन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईमुळे ओडीसाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून हे आमदारांचे राजकीय भवितव्य काय राहणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com