Biparjoy Cyclone Alert: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम, 6 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

Heat Alert: हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.
Biparjoy Cyclone Alert
Biparjoy Cyclone AlertSaam Tv
Published On: 

Monsoon 2023: देशातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे अनेक राज्यात उकाडा प्रचंड वाढला आहे. पण अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरुच आहे. अशामध्ये सर्वांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे मान्सूनची. मान्सून (Monsoon) कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण मान्सूनचा प्रवास आणखी लांबणार असल्याची माहिती हवामाना खात्याने दिली आहे. त्यात हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.

Biparjoy Cyclone Alert
Cyclone Biparjoy: अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ; या राज्यांना सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) तयार झाल्यामुळे केरळमध्ये मान्सून उशीरा दाखल होणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणूनच देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून देशातील अनेक राज्यात उष्णता आणखी वाढणार आहे. बिहार आणि पश्चिम बंगालसह 6 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (heat wave)ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. तसंच या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Biparjoy Cyclone Alert
Sharad Pawar News: राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत; शरद पवार गंभीर आरोप

हवामान खात्याने पुढे सांगितले की, बिहारचा काही भाग, पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणामधील काही भागांमध्ये उष्णतेची लाट 10 जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचसोबत उत्तर प्रदेशात 8 जूनपासून उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. तर पुढील 5 दिवसांत केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Biparjoy Cyclone Alert
Maharashtra Politics: "डबल इंजिन सरकारला ‘तेलपाणी’ करण्यासाठी वारंवार दिल्लीच्या सर्व्हिसिंग स्टेशनला जावं लागतंय"

राजस्थानच्या बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, पाली, उदयपूर, चित्तोडगडमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागाने या भागात यलो अलर्ट देखील जारी केला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागात बुधवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील पुणे, मुंबईमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, सध्याची हवामानाची स्थिती पाहता दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या 24 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळाला बांगलादेशने बिपरजॉय हे नाव दिले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात गोव्यापासून 950 किलोमीटर तर मुंबईपासून 1,100 किलो मीटर अंतारवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com