Maharashtra Political Latest News: महाराष्ट्रात गतिमान सरकार आल्याची पुंगी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस वाजवत असतात. आपले सरकार ‘डबल इंजिन’वाले आहे असे ते म्हणतात. पण इंजिनास ‘तेलपाणी’ करण्यासाठी त्यांना वारंवार दिल्लीच्या सर्व्हिसिंग स्टेशनला जावे लागते. यालाच जर हे लोक गतिमान सरकार म्हणत असतील तर काय बोलायचे?, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून शिंदे सरकारवर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
"सत्य असे आहे की, तथाकथित गतिमान सरकारचा वेग बैलगाडीपेक्षा कमी आहे. वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही आणि विस्तार व्हावा यासाठी मिंधे-फडणवीस दिल्लीस हेलपाटे मारून थकले आहेत. जे सरकार वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत दाखवू शकले नाही त्यांनी गतिमानतेच्या गोष्टी कराव्यात याचे आश्चर्य वाटते", असंही सामनात मांडण्यात आलं आहे. (Maharashtra Political News)
"मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर पहिला विस्तार करायला 41 दिवस लागले व त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही. कारण सगळाच ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असे चित्र आहे", असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.
"निवडणुका घेतल्या तर शिवसेनेचाच (Shivsena) महापौर होईल या भयाने गतिमान सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकला आहे. भारतीय जनता पक्षाची बदके अधूनमधून आमचाच महापौर असे सांगत आहेत. त्यावर गतिमान मिंधे गट बोलायला तयार नाही. मुंबईत निवडणुका झाल्या तर जनता धुलाई केल्याशिवाय राहणार नाही", असा घणाघात देखील सामना अग्रलेखातून सरकारवर करण्यात आला आहे.
"स्वयंघोषित गतिमान सरकार खोकेबाजीत वेगवान, पण इतर कार्यात बैलगाडीच्याही मागे आहे हीच वस्तुस्थिती आहे. मुंबईस (Mumbai) महापौर नाही आणि कालपर्यंत मुंबई विद्यापीठास कुलगुरू नव्हते, पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी मात्र लगबग सुरू आहे. अर्थात त्या लगबगीत गती असली तरी विस्तार रखडलेलाच आहे", असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.