Cyclone Biparjoy: अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ; या राज्यांना सतर्कतेचा इशारा

Cyclone Biparjoy News: बांगलादेशने या नव्या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलं आहे.
Cyclone Biparjoy
Cyclone BiparjoySaam Tv
Published On

Cyclone Biparjoy Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरुच आहे. त्यानंतर आता हवामानात बदल झाल्याने अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे. बांगलादेशने या नव्या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलं आहे. (Latest Marathi News)

Cyclone Biparjoy
Pune Crime News: हातात कोयता, खिशात ५-६ मोबाईल; दहशत करायला निघाला अन् थेट पोलीस कोठडीत पोहचला

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात खोल दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याचे रूपांतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळात झाले. पुढील काही तासांत हे वादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर (Palghar) व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. (Cyclone News)

मच्छिमारांना मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पुढील 48 तासांत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ या हंगामात अरबी समुद्रात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे.

हे चक्रीवादळ 8,9 आणि 10 जूनला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार आहे. कोकण, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर 8 ते 10 जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Marathi News)

Cyclone Biparjoy
Maharashtra Politics: ठाण्यात भाजप विरुद्ध ठाकरे गट लढत? शिंदे हक्काचा मतदारसंघ भाजपला सोडणार असल्याची चर्चा

बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये अलर्ट

'बिपरजॉय' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता गुजरातमध्येही खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील सर्व बंदरांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाने मच्छिमारांना खोल समुद्रात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. वादळाचा धोका लक्षात घेता उत्तर गुजरातमधील बंदरांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com