Crime News: बायको माहेरी गेली, नवऱ्याचा पारा चढला, पेट्रोल टाकून स्वत:ला लावली आग

Husband-wife dispute Bihar News: पत्नी वारंवार माहेरी जात असल्याकारणाने पतीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर रामपूर हादरलं आहे.
Bihar Crime News
Crime NewsAI Photo
Published On

Bihar Crime News: पत्नी वारंवार माहेरी जात असल्याकारणाने पतीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना बिहारच्या चंपारण जिल्यातील नरकटियागंजच्या शिकारपूर पोलिस स्टेशन हद्दीतील रामपूर गावात घडली आहे. पतीने स्वतःला जाळून घेतलं. नंतर तरुणाला जळताना पाहून त्याच्या सासरच्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. तरुणावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तरुणाचे नाव रामबाबू चौधरी (२८) असे आहे. तो बगाहा येथील रहिवासी होता. पोलीस अधिकारी अवनीश कुमार यांनी सांगितले की, पत्नी वारंवार माहेरी जात असल्याकारणाने पती रागावला होता. बुधवारीही नवरा बायकोमध्ये भांडण झालं होतं. नंतर ती तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती.

Bihar Crime News
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, VIDEO पोस्ट करत सांगितलं पद सोडण्यामागचं कारण

रामबाबू आपल्या पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी सासरी गेला होता. त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्याच्यासोबत परत येण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून तरुणाने त्याच्या दुचाकीतून पेट्रोल काढले. प्रथम त्याने दुचाकीवर पेट्रोल शिंपडले आणि आग लावली. मग त्याने स्वतःच्या शरीरालाही पेटवून घेतलं.

Bihar Crime News
Pune Metro construction: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! मेट्रोवरच डोळा; अडीच लाखांचं साहित्य लंपास

तरुणाला जळताना पाहताच सासरच्या लोकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.नंतर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com