
बिहारमधील मोकामा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी गोळीबारच्या घटनेने मोकामाची चर्चा रंगलीय. बिहारमध्ये छोटे सरकार नावाने प्रसिद्ध असलेले बाहुबली नेते अनंत सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार झालाय. त्यांच्या ताफ्यावर ६० ते ७० राऊंड फायर करण्यात आल्या. गोळीबारीची घटना सोनू-मोनूची गँगने हा गोळीबार घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान सोनू-मोनू गँग आणि अनंत सिंह यांच्यात आधीही आमनेसामने आलेत.
दरम्यान या गोळीबारीच्या घटनेनंतर पाटणामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गोळीबारीची घटना मोकामा प्रखंडच्या हेमजा गावात घडलीय. गोळीबार झाला तेव्हा अनंत सिंह गावातील लोकांना भेट होते. त्याचदरम्यान सोमू-मोनू गँगने अनंत सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार केला, सुदैवाने अनंत सिंह हे थोडक्यात बचावले. तर ताफ्यातील एका व्यक्तीला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. संपूर्ण परिसरातच नव्हे तर पोलीस आणि प्रशासन यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेनंतर बाढ येथील एएसपी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या बंदोबस्तात अनंत सिंह यांना त्यांच्या ताफ्यासह तेथून रवाना करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं माहिती एएसपी राकेश कुमार यांनी दिलीय.
ते म्हणाले की, या घटनेत अद्याप कोणीही जखमी किंवा ठार झाले नाहीये. हाती आलेल्या माहितीनुसार, मोकामा परिसरातील लोकांनी अनंत सिंह यांच्याकडे तक्रार केली होती की सोनू-मोनू टोळीने त्यांच्या समर्थकांच्या घरांवर कब्जा केलाय. या हल्ल्याची माहिती मिळताच अनंत सिंह तेथील लोकांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी सोनू-मोनू टोळीच्या गोळीबार केला. अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी या मोकामा येथून आरजेडीच्या तिकिटावर आमदार आहेत.
सध्या नितीश कुमार यांच्या पक्ष जेडीयूला पाठिंबा देत आहेत. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की, अनंत सिंग सोनू-मोनूच्या घरी पोहोचले होते. तिथे दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.