पुलासाठी ७ कोटी खर्च केला, ३ वर्षांत तडे गेले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

araria bridge news : ७ कोटी खर्च करण्यात आलेल्या पुलाला तडे गेले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं आहे.
bihar news
araria bridge Saam tv
Published On
Summary

बिहारमधून मोठी बातमी समोर

बिहारमध्ये आणखी एका पुलाला पडले तडे

प्रशासनाकडून कंत्राटदार कंपनीला कारवाईचा इशारा

बिहारमधून मोठी बातमी हाती आली आहे. बिहारच्या भागलूपरच्या विक्रमशिला गंगा पूल दुर्घटनेनंतर आणखी एक पुलाला तडे गेल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाला पाहणी करण्याचे काम सोपवण्यात आलं. त्यावेळी अरारिया भागातील अनेक पूल कमकुवत असल्याचे आढळून आले. या अहवाल समोर आल्यानंतर अरारियामधील आणखी एक पुलाला तडे गेल्याचे समोर आलं आहे.

अरिराया जिल्ह्यातील परमान नदीवर झमटा-महिषाकोल पूल आहे. या पुलाला बांधून ३ वर्ष झाले नाही, तोपर्यंत पुलाला तडे गेले आहेत. पुलाच्या रेलिंग आणि वरच्या भागाला तडे पडले आहेत. त्यामुळे पूल कोणत्याही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुलाला तडे गेल्यानंतरही पुलावरील वाहतूक सुरू आहे.

२०६.७२ मीटर लांबीचा हा पूल २०२२ साली बांधण्यात आला होता. हा पूल बांधायला ७.३२ कोटी रुपयांचा खर्च लागला.

ग्रामीण कार्य विभागाने पुलाला विकास मॉडेल म्हणून सादर केला. पुलाला अवघ्या ३ वर्षात तडे गेल्याने सर्वत्र टीका होऊ लागली आहे. पूल तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून पूल तयार करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनेकदा स्थानिकांनी आंदोलन करून काम थांबवलं होतं. परंतु ठेकेदार आणि इंजिनीअरने स्थानिकांची समजूत काढून पुलाचं काम सुरू ठेवलं.

bihar news
Crime News: व्यायामामुळे बायको झाली फिट; जिमवरून येताच नवऱ्याने केली हत्या, सनकी 7 तास मृतदेहाजवळ बसून राहिला

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पूल तयार करताना तांत्रिक चुका आढळून आल्या होत्या. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे मजबूत आवश्यक होता. पैसे वाचवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आलं. प्रशासनाचा भ्रष्टाचार हळूहळू उघडकीस येत आहे. हा पूल जवळपास २५ ते ३० गावांना जोडतो. नेपाळ आणि इतर भागात जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे.

bihar news
Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ग्रामीण कार्य विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर कुमार यांनी एका पथकासह घटनास्थळी पाहणी केली. या पुलाचं काम पुन्हा करावं लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विभागाने पूल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला नोटीस बजावली असून डिपॉझिट केलेली रक्कम जप्त करण्याचा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com