Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Death Threat To Deputy Chief Minister: बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी आलीय. ही धमकी त्यांच्या समर्थकाच्या मोबाईलवर मेसेजद्वारे देण्यात आलीय.
Death Threat To Deputy Chief Minister
Death Threat To Deputy Chief Ministersaam tv
Published On
Summary
  • बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • ही धमकी त्यांच्या समर्थकाच्या मोबाईलवर मेसेजद्वारे आली आहे.

  • मेसेजमध्ये २४ तासांत गोळी घालण्याचा इशारा दिला गेला आहे.

  • पोलिसांनी तपास सुरू केला असून सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थकाच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आलाय. २४ तासाच्या आत स्रमाट चौधरी यांना गोळी मारेन, खरं बोलतोय, असा धमकीचा मेसेज मोबाईलवर पाठवण्यात आलाय. धमकीचा मेसेज आल्यानंतर चौधरी यांच्या समर्थकाने पोलिसांनी याबाबत माहिती देत तक्रार नोंदवलीय. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये गुन्हेगारी वाढलीय. त्यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान गेल्या सात दिवसांत बिहारमध्ये ९७ खून झालेत, असा दावा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केला होता. पण पोलिसांनी हा आकडा फेटाळून लावलाय. २० जुलैपासून फक्त ४० खून झाल्याचे पोलिसांनी सांगितलंय.

Death Threat To Deputy Chief Minister
Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

बिहारमध्ये एका आठवड्यात ९७ हत्या! पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत! समस्तीपूरमध्ये कैद्याची हत्या, सारण आणि मुझफ्फरपूरमध्ये व्यापाऱ्यांची हत्या, बेगुसरायमध्ये व्यापाऱ्याची हत्या,समस्तीपूरमध्ये सरपंचाची हत्या, ITBP जवानाची हत्या, गयामध्ये एका वृद्धाचे अपहरण आणि हत्या,पाटनामध्ये एका महिलेची गोळीबारात हत्या, दोन भावांवर गोळीबार ज्यात एकाचा मृत्यू झाला. बिहारमध्ये गुन्हेगारांचे राज्य आहे, कारण सरकार अपयशी ठरले आहे!" असं तेजस्वी यादव यांनी एक्सवर पोसल्ट केली होती.

Death Threat To Deputy Chief Minister
Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

दरम्यान बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून विरोधक सतत सरकारवर निशाणा साधत आहेत. सरकार गुन्हेगारांना लगाम घालू शकते का की, गुन्हेगार अशाच प्रकारे सरकारला आव्हान देत राहतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com