Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Bihar Politics : तेज प्रताप यादव यांनी टीम तेज प्रताप यादव तयार केली. ते या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
Bihar Politics
Tej Pratap Yadav announces ‘Team Tej Pratap’ and declares independent candidacy from Mahuasaam tv
Published On

राजकारणातील आखणी एका घरात फुट पडलीय. आता एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलानं वेगळी वाट पकडत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच ठरवलंय. राजकीय युद्ध होतंय, बिहारमध्ये. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. इतकेच नाही तर त्यांनी वडिलांच्या पक्षाविरोधातच दंड थोपटले आहेत.

राजदमधून हकालपट्टी केलेले आमदार आणि लालू यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी एक मोठी घोषणा केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ते महुआ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी तेज प्रतापची टीम स्थापन केली असून ३१ जुलै रोजी वैशाली जिल्ह्यातील महुआ येथेही ते एक सभा घेणार आहेत.

बनवली टीम तेज प्रताप यादव

याआधी २५ जुलै रोजी तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या बहिणी मीसा भारती, राजलक्ष्मी आणि हेमा यादव यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनफॉलो केले होते. त्यांनी आरजेडीचे अधिकृत अकाउंटही अनफॉलो केले आहे. आता त्यांची नवीन टीम तयार करून, तेज प्रताप यादव यांनी स्वतःला कुटुंबापासून दूर करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान हे कुटुंबाविरुद्ध बंड आहे की परिस्थितीसमोर न झुकण्याचा हट्टीपणा हे येणारा काळच सांगेल. पण तेज प्रताप यांची अशी वेगळी वाट पकडणं लालू प्रसाद यादव यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी मोठं आव्हान असणार आहे.

दरम्यान बिहार सरकारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव म्हणाले की, त्यांनी बनवलेली टीम तेज प्रताप यादव ही जनतेपर्यंत पोहचणारं व्यासपीठ आहे. यावेळी राज्यात बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सरकार येणार नाही. जो कोणी सरकार स्थापन करेल, जो तरुण, रोजगार, शिक्षण, आरोग्य याबद्दल लढा देतील. त्यांच्यासोबत तेज प्रताप यादव संपूर्ण ताकदीने उभे राहील. मी महुआमधून निवडणूक लढवणार आहे. अनेक विरोधक आहेत, ते अडचणी निर्माण करत आहेत,असेही तेजप्रताप यादव म्हणाले.

Bihar Politics
Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

माझ्या टीमचा रंग पिवळा आहे. पिवळा हा आमच्या धर्माचा रंग देखील आहे. मदन यादव हे शाहपूरमधून टीम तेज प्रताप यादव यांचे उमेदवार असतील, अशी घोषणाही तेज प्रताप यादव यांनी केलीय. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांना आपल्या टीममध्ये सामील होण्याचे आवाहन केलंय. बिहारमधील कोणीही टीम तेज प्रतापमध्ये सामील होऊ शकतो, असं ते म्हणालेत.

दरम्यान शाहपूरमधून उमेदवारी मिळालेले मदन यादव हे देखील आजच तेज प्रताप यादव यांच्या टीममध्ये सामील झालेत. तर तेज प्रताप यादव यांनी त्यांची उमेदवारी सुद्धा घोषित केलीय. "मी महुआमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे." टीम तेज प्रतापच्या बॅनरखाली अधिक लोक निवडणूक लढवतील,असं त्यांनी यावेळी सांगितलं. तेजस्वी यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत ते म्हणाले की आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत असू. तर नितीश कुमार यांच्याबाबत ते म्हणाले की ते आता मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com