Crime News : माता न तू वैरिणी! आधी केलं मद्यपान, नंतर पोटच्या मुलींसोबत केलं भयानक कृत्य, मन सुन्न करणारी घटना

Bihar Crime News : गुरूवारी रात्री पती-पत्नीने अगोदर मद्यपान केलं. त्यानंतर दोन्ही मुली बेडरुममध्ये झोपलेल्या असताना त्यांनी दोघींचाही गळा आवळून खून केला.
Bihar Crime News
Bihar Crime NewsSaam TV

Bihar Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामधील अनेक घटना ह्या अनैतिक संबंध, तसेच प्रेमसंबंधातून घडत असल्याचं समोर आलं आहे. बिहारमधील अशाच एका घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. इथे एका महिलेने तिच्या दोन तरुण मुलींची गळा आवळून हत्या केली आहे. (Latest Marathi News)

Bihar Crime News
Viral Video : धक्कादायक! महिलेनं पाळीव कुत्र्याला लिफ्टमध्ये नेलं अन्.., निर्दयी कृत्याचा VIDEO व्हायरल

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सराय पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना (Crime News) घडली. मृत मुलींपैकी एकीचे वय १८ वर्ष असून दुसरीचे वय १६ वर्ष होते. याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेला अटक केली असून आपणच पतीच्या मदतीने दोन्ही मुलींची हत्या केली असल्याची कबूली महिलेनं दिली आहे.

या घटनेनंतर महिलेचा पती फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिच्या दोन्ही मुलींचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्या रात्री घरी उशीरा येत असतं.  (Breaking Marathi News)

याशिवाय त्या दोन-दोन दिवस बाहेरच राहत होत्या. दोन्ही मुलींनी अनेकदा घरातून पळून जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मुलींच्या अशा वागण्याने सर्वजण नाराज होते. अनेकदा समजावून सांगून सुद्धा मुली काही आई वडिलांचं ऐकण्यास तयार नव्हत्या.

Bihar Crime News
Mumbai Local Video: महिलांच्या डब्यासमोर उभं राहून तरुणाचे अश्लील चाळे; महिलेने VIDEO शूट करून पोलिसांकडे केली तक्रार

दरम्यान, समाजात बदनामी होण्याच्या भीतीने महिलेने आणि तिच्या पतीने दोन्ही मुलींची हत्या करण्याचा कट आखला. गुरूवारी रात्री पती-पत्नीने अगोदर मद्यपान केलं. त्यानंतर दोन्ही मुली बेडरुममध्ये झोपलेल्या असताना त्यांनी दोघींचाही गळा आवळून खून केला.

हत्येनंतर त्यांनी मुलींच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, याची कुणकुण शेजारच्यांना लागली. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने महिलेच्या घरी छापा टाकून झाडाझडती केली असता दोन्ही मुलींचे मृतदेह एका बंद खोलीत आढळून आले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी (Police) आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून महिलेचा पती फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथक रवाना केली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनी पोटच्या मुलींची हत्या केल्याचं उघड होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com